राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (NCP)
Read More »
श्री. शरद पवार राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय कृषिमंत्री
श्री. अजित पवार उपमुख्य मंत्री महाराष्ट्रराज्य उर्जा / अर्थ आणि नियोजन
7th April 2011
सिंचन प्रकल्प वर्षभरात पूर्ण करणार - सुनील तटकरे
नवापूर तालुक्यातील भुरीवेल कोरडा नाला मध्यम प्रकल्प, पिंप्राणी, पानबारा, बर्डीपाडा या लघुपाटबंधारे योजनांची कामे हाती घेण्यात आली असून हे प्रकल्प वर्षभरात पूर्ण करण्यात येतील. त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे प्रतिपादन जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी धानोरा येथे आयोजित मेळाव्यात केले.
4th April 2011
नर्मदेचे पाणी वळविण्यासाठी तिन्ही राज्यांत होणार मंथन
नंदुरबार - नर्मदेचे पाणी तापी नदीत वळविण्याबाबत महाराष्ट्रासह गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यात मंथन केले जाणार आहे. त्यानुसार या राज्यांच्या जलसंपदा विभागांची लवकरच संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे. राज्यातील अडीच लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे नियोजन असल्याची माहिती जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी "सकाळ'ला दिली.
3rd April 2011
लघुपाटबंधारे योजनांसाठी सुधारित मापदंडाचा प्रस्ताव
मुंबई - राज्यातील लघुपाटबंधारे योजनांसाठी सुधारित मापदंड करण्याचा प्रस्ताव शासन स्तरावर प्रलंबित आहे. त्या दृष्टीने नियोजन विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून अधिवेशन संपण्यापूर्वी योग्य निर्णय घेण्यात येईल, असे ठोस आश्वासन जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी शुक्रवारी (ता. 1) विधान सभेत दिले.
2nd April 2011
शहादा व नवापूर तालुक्यातील लघुपाटबंधारा योजनेचे उद्घाटन
ना.सुनील तटकरे यांच्या हस्ते उद्या तापी पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत नवापूर व शहादा तालुक्यातील लघु पाटबंधारे योजनेचे भूमिपुजन दि.3 एप्रिल रोजी जलसंपदामंत्री ना.सुनिल तटकरे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री ना.डॉ.विजयकुमार गावीत, पालकमंत्री ना.ऍड.पद्माकर वळवी उपस्थित राहणार आहेत.
1st April 2011
कोकणातील पाटबंधारे प्रकल्पांसाठी साडेपंधराशे कोटी
कणकवली - कोकणातील रखडलेल्या 39 पाटबंधारे प्रकल्पांसाठी 1550 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात सिंधुदुर्गातील 12 प्रकल्पांचा समावेश आहे. त्यासाठी 838.56 कोटीची तरतूद आहे. तसेच कोकण पॅकेज अंतर्गत पाटबंधारे प्रकल्पांसाठी 285.60 कोटी एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी आज विधीमंडळात दिली.
28th Jan 2011
असा रंगला फेस्टिवल
रमणीय समुदकिनारा, पुरातन देवस्थानं, नारळी-पोफळीच्या बागा अशा निसर्गरम्य वातावरणात श्रीवर्धनमध्ये नुकताच तीन दिवस बीच फेस्टिवल रंगला होता. सिनेअभिने त्री ऊर्मिला मातोंडकर, ज्येष्ठ कलाकार सुदेश भोसले, लावणी नर्तिका सुरेखा पुणेकर यासारख्या दिग्गज कलाकारांची उपस्थिती, पुरणपोळी, उकडीच्या मोदकांपासून सुरमई फ्राय, कोळंबी बिर्याणीपर्यंत चमचमीत खाद्यपदार्थांची रेलचेल, छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत साऱ्यांना सहभागी करून घेणाऱ्या विविध स्पर्धा ही या बीच फेस्टिवलची वैशिष्ट्यं ठरली. अनिकेत तटकरे यांनी या बीच फेस्टिवलचं खास आयोजन केलं होतं. श्रीवर्धनकरांपासून ते मुंबई-पुण्याहून आलेल्या पर्यटकांनी या फेस्टिवलसाठी गदीर् केली होती.
२२ जानेवारी
श्रीवर्धन बीच फेस्टिव्हल
निसर्गसौंदर्याची मुक्त उधळण असलेल्या कोकणच्या भूमीत एकापेक्षा एक सुंदर समुदकिनारे आहेत. रुपेरी वाळू, निळंशार पाणी हे सारं काही अनुभवायचा असेल तर कोकणात धाव घेण्याशिवाय पर्यायच नाही. श्रीवर्धन, दिवेआगार, हरिहरेश्वर इथल्या बीचेसचं सौंदर्य आणि लोककलांचा महोत्सव अनुभवण्याची संधी २३ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या 'श्रीवर्धन बीच फेस्टिव्हल'च्या निमित्ताने पर्यटकांना मिळेल
जयंत धुळप ,अलिबाग,२० जानेवारी
आजपासून साकारणार ‘श्रीवर्धन बीच फेस्टिव्हल’
पित्याची कल्पकता, पुत्राची सुयोग्य अंमलबजावणी आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग यांचा आगळा मिलाफ उद्यापासून पुढील तीन दिवस ‘स्वर्गभूमी’, ‘रमणीय’ या विशेषणांनी युक्त अशा पेशव्यांच्या पदस्पर्शाने पुनित तर ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरिहरेश्वरच्या पवित्र किनाऱ्यानजिक श्रीवर्धन समुद्र किनारी संपन्न होणाऱ्या ‘श्रीवर्धन बीच फेस्टिव्हल’च्या निमित्ताने अनुभवास येणार आहे.
20th Jan 2011
बीच फेस्टिव्हलसाठी श्रीवर्धन सज्ज
श्रीवर्धन - सुंदर आणि स्वच्छ समुद्रकिनारे, किनाऱ्याला समांतर घनदाट झाडी, निसर्गाने मुक्तपणे उधळलेले वैभव अशी पार्श्वभूमी लाभलेल्या स्वर्गभूमी श्रीवर्धनमध्ये शुक्रवारपासून (ता.21) तीन दिवस श्रीवर्धन बीच फेस्टिव्हल सुरू होत आहे. या फेस्टिव्हलच्या निमित्ताने श्रीवर्धन शहर सजले असून मोठ्या संख्येने पर्यटक आताच दाखल झाले आहेत. "सकाळ' या फेस्टिव्हलचे माध्यम प्रायोजक असून पालकमंत्री सुनील तटकरे यांच्या संकल्पनेतून हा फेस्टिव्हल साकार होत आहे.
रोहा, दि. ११ (वार्ताहर)
पळस्पे ते इंदापूर चौपदरीकरणाला मंजुरी ......बांधकाममंत्री भुजबळ यांची माहिती
कोकणातील महत्त्वाचा समजला जाणारा मुंबई-गोवा महामार्गावरील पळस्पे ते इंदापूर हा पहिला टप्पा मंजूर झाला आहे. पुढच्या टप्प्यासाठी सर्व्हेनंतर हे कामही मार्गी लागेल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
भातसानगर, दि. ६ (वार्ताहर)
जलसंपदामंत्री घेणार सकारात्मक भूमिका......भातसा प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी
मुंबईतील दीड कोटी जनतेची तहान भागविणाऱ्या भातसा धरणामुळे विस्थापित प्रकल्पग्रस्तांचे ४२ वर्षांनंतरही पुनर्वसन झालेले नाही. इतकेच नव्हे तर अनेक कुटुंबे विस्थापनामुळे धुळीस मिळाली आहेत. यासंबंधी जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी भातसा धरणामुळे विस्थापित झालेल्या १४२ कुटुंबांसाठी शासकीय स्तरावर सकारात्मक भूमिका घेऊन त्यांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सूतोवाच भातसा धरण भेटीत व्यक्त केले.
November 12th, 2010
तटकरेंना कोणते खाते मिळणार
मालवण - कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या अर्थमंत्री सुनील तटकरे यांना आता कोणत्या मंत्रिपदाची "लॉटरी' लागणार, याकडे कोकणवासीयांचे लक्ष लागले आहे.
November 9th, 2010
वड्ड समाजाच्या विकासासाठी प्रयत्¬न करु - सुनील तटकरे
कोल्हापूर दि.८-वड्ड समाजाच्या विकासासाठी शास नातर्फे नि धी मिळवू न देण्यासाठी प्रयत्न करु,असे प्रतिपाद न राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुनील तटकरे यां नी केले.
September 06, 2010
मराठी शाळांना परवानगीबाबत सकारात्मक निर्णय घेऊ : तटकरे
''गेल्या ५० वर्षात राज्यात जेवढ्या मराठी शाळांना परवानगी देण्यात आली त्या शाळा विद्यार्थी संख्येनुसार योग्य प्रमाणात आहेत. गेल्या वर्षी कायम विना अनुदानित तत्त्वावर शासनाने ३ ते ४ हजार शाळांना परवानगी दिली होती. पण काही काळानंतर या शाळा अनुदानाची मागणी करू लागल्या. दुसरीकडे इंग्रजी माध्यमाच्या शाळा शासनाकडून अनुदान घेत नाहीत. हे जरी खरे असले तरी शासन मराठी माध्यमाच्या शाळांवर अन्याय होईल, असा निर्णय घेणार नाही. -सुनिल तटकरे
१६ एप्रिल २०१०
मुंबईसाठी राज्य शासनाची ९,६५४ कोटींची तरतूद - तटकरे
४ एप्रिल २०१०
शिक्षणसेवकांचे मानधन वाढवण्याचे ग्रामविकास मंत्र्यांचे आश्वासन नाशिक, दि. ३ (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या रोहा येथे झालेल्या राज्यस्तरीय अधिवेशनात शिक्षणसेवक, वस्तीशाळा शिक्षकांच्या मानधनात वाढ करण्याबरोबरच अन्य मागण्या सोडविण्याचे आश्वासन ग्रामविकास मंत्री जयंत पाटील व वित्तमंत्री सुनील तटकरे यांनी दिल्याची माहिती समितीने पत्रकान्वये दिली आहे.
बेदाण्याचा व्हॅट रद्द होणार : शरद पवारांची अर्थमंत्र्यांना सूचना सभापती प्रकाश जमदाडे यांची माहिती सांगली, दि. ४ (प्रतिनिधी) : बेदाण्यावर लावण्यात आलेला पाच टक्के व्हॅट रद्द करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला यश मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी अर्थमंत्री सुनील तटकरे यांना तशी सूचना दिली असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश जमदाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, जमदाडे आज नेत्यांना भेटण्यासाठी शिष्टमंडळासह मुंबईला रवाना झाले.
३ एप्रिल २०१०
एक कोटी २२ लाख रुपयांच्या नियंत्रित शिधाजिन्नसाचा अपहार शिधावाटप नियंत्रकांकडून चौकशी समिती नेमण्यास तब्बल आठ महिने विलंब घाटकोपर भागातील शिधावाटप कार्यालय क्रमांक ३४-ई अंतर्गत ११ शिधावाटप दुकानांना १६३८ इतक्या बोगस शिधापत्रिका संलग्न करून रॉकेल व धान्यादी वस्तूंचा सुमारे एक कोटी २२ लाख रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी मंत्रालयातून आदेश जाऊनही शिधावाटप नियंत्रकांनी चौकशी समिती नेमण्यासाठी तब्बल आठ महिने विलंब केल्याचे निष्पन्न झाले आहे. इतकेच नव्हे तर या प्रकरणी संबंधित शिधावाटप अधिकाऱ्यावर कोणतीही कठोर कारवाई झालेली नाही किंवा कोणाला बळीचा बकराही बनविण्यात आलेले नाही ही देखील आश्चर्याची बाब मानली जात आहे.
रेशनकार्डधारकांसाठी शुल्ककाष्ठ कायम! रेशनकार्डांची वैधता तपासण्यासाठी तासनतास रांगा लावून सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली असतानाच राज्यकर्त्यांच्या डोक्यात आलेल्या नव्या कल्पनेमुळे पुन्हा रांगा लावण्याचे दिव्य रेशनकार्डधारकांच्या नशिबी येणार आहे. संगणकीय रेशनकार्डे देण्याचे काम गेली अनेक वर्षे प्रलंबित असताना आता बायोमेट्रिक रेशनकार्डे देण्याचे घाटत आहे. यासाठी रेशनकार्डांवर नावे असलेल्या सर्वांच्या बोटांचे ठसे घेतले जाणार आहेत.
२ एप्रिल २०१०
रत्नागिरीला ‘ब’ पर्यटन स्थळाचा दर्जा अर्थमंत्री सुनील तटकरे यांनी सादर केलेल्या सन २०१०-११च्या अर्थसंकल्पात कोकणाच्या पदरात भरभरून माप टाकल्याने, आता या मागास व गेली अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या प्रदेशाचा सर्वांगीण विकास जलदगतीने होणार आहे, असा विश्वास रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी काल केला आहे.
२९ मार्च २०१०
अर्थमंत्री सुनील तटकरे यांची वेबसाइट रायगडसह राज्यातील जनतेला संपर्क साधता यावा, यासाठी अर्थमंत्री सुनील तटकरे यांची स्वत:ची वेबसाइट बनवली आहे. त्या वेबसाइटचे तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
२८ मार्च २०१०
धक्कादायक निकाल? कोकणातील पर्यटन, शिक्षण, पायाभूत सुविधांसाठी अनेक योजनांसाठी बजेटमध्ये तरतूद करण्यात अर्थमंत्री सुनील तटकरे यांच्या प्रयत्नांना यश आले असले तरी कोकण स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या उद्या रविवारी जाहीर होणा - या निकालाचा कौल अर्थमंत्र्यांच्या बाजूने लागणार की नाही याविषयी कोकणातील तीन जिल्ह्यांत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
श्री. अनिल तटकरे विजयी