श्री. सुनील तटकरे यांच्याविषयी थोडेसे

दोन दशकांहून अधिक काळ ते महाष्ट्राच्या राजकारणात सक्रीय आहेत. यापूर्वी तटकरे साहेबांनी नगरविकास खात्याचे राज्यमंत्री ( ऑक्टोबर १९९९ ते २००४ ), अत्र व नागरी पुरवठा, साहक संरक्षण विभागाचे मंत्री (२००४ ते २००८ ) आणि उर्जा मंत्री (२००८ ते २००९ ) म्हणून यशस्वीपणे काम केला आहे. तत्त्वांशी प्रामाणिक राहणारे तटकरे साहेब फ्रखर बुद्धिवादी नेते म्हणून ओळखले जातात.समर्थ आणि बलशाली महाराष्ट्र घडविण्याच्या संकल्पनेचे ते कट्टर समर्थक आहेत.

picture

सुरुवातीचा कालखंड

श्री सुनील तटकरे यांचा जन्म १० जुलै १९५५ रोजी रोहा तालुक्यातील कोलाड या छोट्याशा गावात झाला. त्यांचे वडील दत्तात्रय तटकरे यांची परिस्थिती बेताचीच होती. अशा वातावरणात वाढल्याने सुनील तटकरे यांची जडणघडनही वेगळीच झाली. जात, धर्म, पंथ याचा विचार न करता सर्वांशी विनम्रतेने वागायचे व सदैव सर्वांच्या मगतीला धावून जायचे. हेच त्यांनी आपल्या जीवनाचे सूत्र मानले.

शालेय जीवनात एक अत्यंत हुशार विध्यार्थी म्हणून त्यांचा लौकिक होता. प्रत्येक वर्षी शाळेतील त्यांचा पहिला क्रमांक कधी चुकला नाही. आपल्या मुलाने डॉक्टर होवून जनतेची सेवा करावी, त्यांच्या वडीलांची खूप इच्छा होती. परंतु सुनील च्या डोक्यात वेगळेच चक्र सुरु होते. डॉक्टर होऊन कागदी चीठ्यांवर औषथे लिहून दिल्याने जनसेवा होऊ शकत नाही हे सुनीलला तेव्हाच उमगले होते. यापेक्षा आपल्या भागातील लोकांचे राहणीमान कसे उंचावेल त्यांच्या मूलभूत गरजांची पूर्तता कशी करता येईल याचा हायसा सुनीलने घेतला. या दिनेश काय करता येईल याचा शोध ते घेत राहील.

दत्तात्रय तटकरे हे राजकीय कामासाठी प्रचंड दौरे करीत. ज्यावेळी सुनील सदैव त्यांच्या समवेत असत. बर्याचदा तेच मोतोर चालवीत असत. या पिता-पुत्रांमधील संबंध निराळेच होते. जनसेवेच्या नवनव्या कल्पना सुनील तटकरे यांच्या मनात घोळत असताना अचानक वडिलांचे दु:खद निधन झाले. परिणामी कुंटुंबाची सर्व जबाबदारी सुनीलवर आली. महाविध्यालयीन शिक्षण अर्धवट सोडून वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी बांधकाम व्यवसायात पाउल टाकले.

 

Links to Visit

प्रसिद्धी पत्रक

४ एप्रिल २०१०

बेदाण्याचा व्हॅट रद्द होणार : शरद पवारांची अर्थमंत्र्यांना सूचना सभापती प्रकाश जमदाडे यांची माहिती

सांगली, दि. ४ (प्रतिनिधी) : बेदाण्यावर लावण्यात आलेला पाच टक्के व्हॅट रद्द करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला यश मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी अर्थमंत्री सुनील तटकरे यांना तशी सूचना दिली असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश जमदाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, जमदाडे आज नेत्यांना भेटण्यासाठी शिष्टमंडळासह मुंबईला रवाना झाले.

Read More »

३ एप्रिल २०१०

एक कोटी २२ लाख रुपयांच्या नियंत्रित शिधाजिन्नसाचा अपहार
शिधावाटप नियंत्रकांकडून चौकशी समिती नेमण्यास तब्बल आठ महिने विलंब

घाटकोपर भागातील शिधावाटप कार्यालय क्रमांक ३४-ई अंतर्गत ११ शिधावाटप दुकानांना १६३८ इतक्या बोगस शिधापत्रिका संलग्न करून रॉकेल व धान्यादी वस्तूंचा सुमारे एक कोटी २२ लाख रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी मंत्रालयातून आदेश जाऊनही शिधावाटप नियंत्रकांनी चौकशी समिती नेमण्यासाठी तब्बल आठ महिने विलंब केल्याचे निष्पन्न झाले आहे. इतकेच नव्हे तर या प्रकरणी संबंधित शिधावाटप अधिकाऱ्यावर कोणतीही कठोर कारवाई झालेली नाही किंवा कोणाला बळीचा बकराही बनविण्यात आलेले नाही ही देखील आश्चर्याची बाब मानली जात आहे.

Read More »

३ एप्रिल २०१०

रेशनकार्डधारकांसाठी शुल्ककाष्ठ कायम!

रेशनकार्डांची वैधता तपासण्यासाठी तासनतास रांगा लावून सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली असतानाच राज्यकर्त्यांच्या डोक्यात आलेल्या नव्या कल्पनेमुळे पुन्हा रांगा लावण्याचे दिव्य रेशनकार्डधारकांच्या नशिबी येणार आहे. संगणकीय रेशनकार्डे देण्याचे काम गेली अनेक वर्षे प्रलंबित असताना आता बायोमेट्रिक रेशनकार्डे देण्याचे घाटत आहे. यासाठी रेशनकार्डांवर नावे असलेल्या सर्वांच्या बोटांचे ठसे घेतले जाणार आहेत.

Read More »

२ एप्रिल २०१०

रत्नागिरीला ‘ब’ पर्यटन स्थळाचा दर्जा

अर्थमंत्री सुनील तटकरे यांनी सादर केलेल्या सन २०१०-११च्या अर्थसंकल्पात कोकणाच्या पदरात भरभरून माप टाकल्याने, आता या मागास व गेली अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या प्रदेशाचा सर्वांगीण विकास जलदगतीने होणार आहे, असा विश्वास रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी काल केला आहे.

Read More »

२९ मार्च २०१०

अर्थमंत्री सुनील तटकरे यांची वेबसाइट

रायगडसह राज्यातील जनतेला संपर्क साधता यावा, यासाठी अर्थमंत्री सुनील तटकरे यांची स्वत:ची वेबसाइट बनवली आहे. त्या वेबसाइटचे तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

Read More »

२८ मार्च २०१०

धक्कादायक निकाल?
कोकणातील पर्यटन, शिक्षण, पायाभूत सुविधांसाठी अनेक योजनांसाठी बजेटमध्ये तरतूद करण्यात अर्थमंत्री सुनील तटकरे यांच्या प्रयत्नांना यश आले असले तरी कोकण स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या उद्या रविवारी जाहीर होणा - या निकालाचा कौल अर्थमंत्र्यांच्या बाजूने लागणार की नाही याविषयी कोकणातील तीन जिल्ह्यांत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

Read More »

२८ मार्च २०१०

श्री. अनिल तटकरे विजयी

Read More »

२८ मार्च २०१०


Read More »