परिचय
श्री. सुनील तटकरे राजकीय प्रवास
सुनील तटकरे हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते असून २००९ मध्ये ते श्रीवर्धन मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले. त्या अगोदर १० डिसेंबर २००८ रोजी राज्याच्या उर्जामंत्री पदाची जवाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली. राज्यात सर्वत्र वीज टंचाई समस्या असल्याने ग्रामीण जनता अस्वस्त होती. जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे एका दिवसात हा प्रशन सुटणारा नव्हता. परंतु हे कठीण आव्हान तटकरे साहेबांनी स्वीकारली. खात्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर अगोदर विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून माहिती घेतली. नंतर या क्षेत्रातील जाणकारांबरोबर बैठका घेतल्या. खासगी क्षेत्रातून वीज नेर्मीती व्हावी, यासाठी बड्या उद्योगपतींशी विचार विनिमय केला. २०१३ पर्यंत राज्य लोडशेदिंग मुक्त व्हावे या दृष्टीने एक ब्लू प्रिंट तयार केली. आणखी दोन वर्षांनी परिस्थिती खूपच बदलेल. त्यापूर्वी अन्न व नागरी पुरवठा विभागाचे मंत्री म्हणून काम करतांना तटकरे साहेबांनी आपला स्वतंत्र ठसा उमटवला. या विभागातील भ्रष्टाचार मोडून काढून सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत गोरगरीबांना स्वस्त दरात जीवनावश्यक वस्तू मिळाल्या पाहिजेत, यावर त्यांनी भर दिला. नगरविकास हे मंत्रिमंडळातील महत्वाचे खाते असून त्याची जवाबदारी मुख्यमंत्र्यानकडेच असते. या महत्वाच्या विभागाचे राज्यमंत्रीपध हे
जन्म: कोलाड, ता. रोहा, जी. रायगड येथे १० जुलै १९५५ रोजी झाला
व्यवसाय: गेली वीसहून अधिक वर्षे ते राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. सामान्य कार्यकर्ता ते महाराष्ट्रासारख्या क्षेत्रातील प्रगत राज्याचा अर्थमंत्री हा त्यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी काही काळ ते बांधकाम व्यवसायात होते.
शिक्षण: इंटर सायन्स, आंबेडकर महाविध्यालय, महाड.
राजकीय क्षेत्रातील म्हत्वाचे टप्पे :
१९८४ ते १९९२ रायगड जिल्हा युवक कॉंग्रेस अध्यक्ष आणी रोह तालुका कॉंग्रेस समितीचे सचीव.
२१ मार्च १९९२ - १९९५ या काळात रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष.
१९९५ मध्ये पहिल्यांदाच विधानसभेवर निवड.
या निवडणुकीत कोकणातील सर्व कॉंग्रेस उमेदवार पराभूत झाले. फक्त सुनील तटकरे हेच एकमेव कॉंग्रेसचे आमदार म्हणून कोकणात विजयी झाले.
ऑक्टोबर १९९९ व जानेवारी २००३ मध्ये नगरविकास राज्यमंत्री होते.
२००४ ते २००८ या काळात ते नागरी पुरवठा खात्याचे कॅबिनेट मंत्री होते.
२००८ ते २००९ या कालावधीत महत्वाच्या खात्याची जवाबदारी सांभाळली.
२००९ मध्ये तटकरे यांच्या आजवरच्या कामगारीरीची दखल घेयून राज्याचे अर्थमंत्रीपध देण्यात आले.
