प्रसिद्धी पत्रक
२०११ प्रसिद्धी पत्रक
सिंचन प्रकल्प वर्षभरात पूर्ण करणार - सुनील तटकरे
7th April 2011
नंदुरबार / वार्ताहर
नवापूर तालुक्यातील भुरीवेल कोरडा नाला मध्यम प्रकल्प, पिंप्राणी, पानबारा, बर्डीपाडा या लघुपाटबंधारे योजनांची कामे हाती घेण्यात आली असून हे प्रकल्प वर्षभरात पूर्ण करण्यात येतील. त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे प्रतिपादन जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी धानोरा येथे आयोजित मेळाव्यात केले.
जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला वैद्यकीय शिक्षण व फलोत्पादन मंत्री डॉ. विजयकुमार गावित, आदिवासी विकासमंत्री बबनराव पाचपुते उपस्थित होते. आदिवासी विकास विभागामार्फत लाभार्थ्यांना मंत्र्यांच्या हस्ते धानोरा व प्रकाशा येथे साहित्य वाटप करण्यात आले. तसेच प्रकाशा येथील पुलाचे उद्घाटन करण्यात आले. पिंप्राणे प्रकल्पाची ५२९ हेक्टर क्षेत्र सिंचन क्षमता आहे. पानबारा प्रकल्पाची ७६१ हेक्टर तर बर्डीपाडा प्रकल्पाची सिंचन क्षमता ६०४ हेक्टर क्षेत्र आहे. जलसंपदामंत्र्यांनी जिल्ह्याला पूर्ण न्याय देण्याचा आपला प्रयत्न राहील, अशी ग्वाही दिली. सर्व प्रकल्प पूर्ण करण्यात येतील. रंका नाल्याची उंची वाढविण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. डॉ. विजयकुमार गावित यांनी राहिलेल्या कामांचा अनुशेष भरून काढण्यात येणार असल्याचे सांगितले. पाचपुते यांनी आदिवासी विकास विभागाला ३७ हजार कोटींचा निधी प्राप्त झाला असून सहा महिन्यात सर्व योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात येईल, असे सांगितले.
Source :- Loksattaनर्मदेचे पाणी वळविण्यासाठी तिन्ही राज्यांत होणार मंथन
4th April 2011
नंदुरबार - नर्मदेचे पाणी तापी नदीत वळविण्याबाबत महाराष्ट्रासह गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यात मंथन केले जाणार आहे. त्यानुसार या राज्यांच्या जलसंपदा विभागांची लवकरच संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे. राज्यातील अडीच लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे नियोजन असल्याची माहिती जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी "सकाळ'ला दिली.
जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या भूमिपूजन, उद्घाटनासाठी श्री. तटकरे आज येथे आले होते. त्या वेळी संवाद साधला असता ते म्हणाले, की पाण्याची समस्या दिवसेंदिवस बिकट होत आहे. त्यामुळे आहे त्या पाण्याचा योग्य वापर होणे आवश्यक आहे. सिंचन क्षेत्र वाढवतानाच पाण्याचा अपव्यय टाळावा लागेल
नर्मदा खोऱ्यातील पाणी तापी खोऱ्यात आणण्याचा प्रयत्न आहे. याबाबत प्राथमिक सर्वेक्षण झाले आहे. हा प्रकल्प मार्गी लागल्यास खानदेशातील पाण्याची समस्या सोडविण्यास मदत होईल. शेतकऱ्यांना लाभ होईल. या माध्यमातून राज्याचा समतोल विकासही साध्य होईल. येत्या वर्षी दोन ते अडीच लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे नियोजन सुरू आहे. या प्रकल्पाला चालना देण्यासाठी तिन्ही राज्यांच्या जलसंपदा विभागांची लवकरच संयुक्त बैठक घेतली जाणार आहे.
Source :- eSakalलघुपाटबंधारे योजनांसाठी सुधारित मापदंडाचा प्रस्ताव
3rd April 2011
मुंबई - राज्यातील लघुपाटबंधारे योजनांसाठी सुधारित मापदंड करण्याचा प्रस्ताव शासन स्तरावर प्रलंबित आहे. त्या दृष्टीने नियोजन विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून अधिवेशन संपण्यापूर्वी योग्य निर्णय घेण्यात येईल, असे ठोस आश्वासन जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी शुक्रवारी (ता. 1) विधान सभेत दिले.
प्रा. वीरेंद्र जगताप, विजय वडेट्टीवार, अस्लम शेख आदींनी अमरावती विभागातील लघुपाटबंधारे योजनांची लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. तिला उत्तर देताना तटकरे यांनी हे आश्वासन दिले. लघुपाटबंधारेच्या मापदंडात वाढ करण्याची आवश्यकता आहे, फक्त अमरावतीमध्येच नव्हे तर राज्यातील अन्य प्रस्तावांचा विचार करण्यात येईल. तसेच अमरावतीमध्ये जे प्रस्ताव प्रलंबित आहेत, त्यांना विशिष्ट कालावधीत मंजुरी देण्याची खबरदारी घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Source :- Agrowonशहादा व नवापूर तालुक्यातील लघुपाटबंधारा योजनेचे उद्घाटन
2nd April 2011
ना.सुनील तटकरे यांच्या हस्ते उद्या तापी पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत नवापूर व शहादा तालुक्यातील लघु पाटबंधारे योजनेचे भूमिपुजन दि.3 एप्रिल रोजी जलसंपदामंत्री ना.सुनिल तटकरे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री ना.डॉ.विजयकुमार गावीत, पालकमंत्री ना.ऍड.पद्माकर वळवी उपस्थित राहणार आहेत.
तापी पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत नवापूर तालुक्यातील पिंप्राण, भुरीवेल, पानबारा व बर्डीपाडा लघुपाटबंधारे योजनेचे भुमिपूजन व खडकी येथील कोरडी मध्यम प्रकल्प घळभरणी, डावा कालवा भुमिपूजन तसेच प्रकाशा येथे गोमाई नदीवरील पुलाचे उद्घाटने जलसंपदामंत्री ना.सुनिल तटकरे यांच्या हस्ते व वैद्यकीय शिक्षणमंत्री ना. डॉ. विजयकुमार गावीत यांच्या अध्यक्षतेखाली दि.3 एप्रिल रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत होणार आहे.
याप्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून आदिवासी विकासमंत्री ना.बबनराव पाचपुते, पालकमंत्री ना.ऍड.पद्माकर वळवी, जलसंपदा राज्यमंत्री राजेंद्र मुळक, खा.माणिकराव गावीत, आ.शरद गावीत, आ.अमरिशभाई पटेल, जि.प.अध्यक्षा सौ.कुमूदिनी गावीत, उपाध्यक्ष जयपालसिंह रावल, बांधकाम सभापती एम.एस. गावीत, पं.स.सभापती विनायक गावीत उपस्थित राहणार आहेत. नवापूर तालुक्यातील पानबारा, बर्डीपाडा, भुरीवेल, पिंप्राण, खडकी व शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे होणार्या या सर्व कार्यक्रमांना उपस्थितीचे आवाहन तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक ह.के.टोणपे, प्रभारी मुख्य अभियंता आ.श्री.मोरे,नाशिक पाटबंधारे प्रकल्प धुळेचे अधिक्षक अभियंता ना.ला. सावळे यांनी केले आहे.
Source :- Deshdootकोकणातील पाटबंधारे प्रकल्पांसाठी साडेपंधराशे कोटी
1st April 2011
कणकवली - कोकणातील रखडलेल्या 39 पाटबंधारे प्रकल्पांसाठी 1550 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात सिंधुदुर्गातील 12 प्रकल्पांचा समावेश आहे. त्यासाठी 838.56 कोटीची तरतूद आहे. तसेच कोकण पॅकेज अंतर्गत पाटबंधारे प्रकल्पांसाठी 285.60 कोटी एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी आज विधीमंडळात दिली.
कोकणातील पाटबंधारे प्रकल्पांची कामे निधीअभावी रखडली असल्याचा मुद्दा विधान परिषदेत आमदार परशुराम उपरकर, आमदार रामदास कदम, आमदार डॉ.दीपक सावंत यांनी उपस्थित केला होता. यात पाटबंधारे प्रकल्पांसाठी कोकण पॅकेजचा निधीही मिळाला नसल्याचे नमूद केले होते. नरडवे पाटबंधारे प्रकल्पासाठी पालकमंत्री नारायण राणे यांनी कालव्यांची मागणी केली का असाही प्रश्न आमदारांनी उपस्थित केला होता.
जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी कोकणच्या विकासाची गती वाढविण्यासाठी त्या विभागात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी "कोकण विकास कार्यक्रम 2009' सुरू असल्याची माहिती दिली. या अंतर्गत कोकण प्रदेशातील 39 प्रकल्पांसाठी सन 2009 ते 2012 या तीन वर्षाच्या कालावधीत 1550 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. सिंधुदुर्गातील 12 धरणप्रकल्पांसाठी 838.56 कोटीचा निधी मिळणार आहे. याखेरीज कोकण पॅकेजमधूनही 285.60 कोटी रूपये उपलब्ध होणार आहेत. कोकण पॅकेज अंतर्गत सन 2009-10 मध्ये 429.06 कोटी, सन 2010-11 मध्ये फेब्रुवारी अखेरपर्यंत 318.44 कोटी असे मिळून 747 कोटी एवढा निधी उपलब्ध करून दिला आहे असल्याची माहितीही श्री.तटकरे यांनी दिली. दरम्यान पालकमंत्री नारायण राणे यांनी नरडवे धरण प्रकल्पात बधांऱ्यांऐवजी कालव्यांद्वारे पाणी देण्याबाबत कोणतीही मागणी जलसंपदा विभागाकडे केलेली नाही असेही श्री.तटकरे यांनी दिले आहे. विधीमंडळातील या कामकाजाची माहिती आमदार श्री.उपरकर यांनी पत्रकातून दिली आहे
Source :- Global Marathiअसा रंगला फेस्टिवल
28th Jan 2011
रमणीय समुदकिनारा, पुरातन देवस्थानं, नारळी-पोफळीच्या बागा अशा निसर्गरम्य वातावरणात श्रीवर्धनमध्ये नुकताच तीन दिवस बीच फेस्टिवल रंगला होता. सिनेअभिने त्री ऊर्मिला मातोंडकर, ज्येष्ठ कलाकार सुदेश भोसले, लावणी नर्तिका सुरेखा पुणेकर यासारख्या दिग्गज कलाकारांची उपस्थिती, पुरणपोळी, उकडीच्या मोदकांपासून सुरमई फ्राय, कोळंबी बिर्याणीपर्यंत चमचमीत खाद्यपदार्थांची रेलचेल, छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत साऱ्यांना सहभागी करून घेणाऱ्या विविध स्पर्धा ही या बीच फेस्टिवलची वैशिष्ट्यं ठरली. अनिकेत तटकरे यांनी या बीच फेस्टिवलचं खास आयोजन केलं होतं. श्रीवर्धनकरांपासून ते मुंबई-पुण्याहून आलेल्या पर्यटकांनी या फेस्टिवलसाठी गदीर् केली होती.
श्रीवर्धनच्या समुदकिनाऱ्यावर भव्य असं व्यासपीठ उभारण्यात आलं होतं. फेस्टिवल स्थळाच्या प्रवेशद्वारापाशी ठेवण्यात आलेल्या हत्तींच्या भव्य प्रतिकृती दोन भल्यामोठ्या समया, बाहुल्याही अनेकांचं आकर्षण ठरल्या होत्या. अनेकजण त्यांच्याजवळ उभं राहून फोटो काढून घेताना दिसत होते. पहिल्या दिवशी 'बाजीराव-मस्तानी'फेम अंगद म्हसकर आणि प्राची म्हात्रे यांच्या हस्ते हरिहरेश्वर दर्शन आणि पूजा करण्यात आली. श्रीवर्धनमधील विविध संस्कृतींचं दर्शन घडवणाऱ्या चित्ररथांचा सहभाग असलेली मिरवणूक निघाली होती. शालेय मुलांसाठी चित्रकला स्पर्धा झाल्या. राज्याचे जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते या फेस्टिवलचं उद्घाटन झालं. पहिल्याच दिवशी सायंकाळी समुदकिनाऱ्यावर अशोक हांडे यांचा 'आवाज की दुनिया' हा एकापेक्षा एक सरस हिंदी-मराठी गीतांचा कार्यक्रम रंगला. दुसऱ्या दिवशी सकाळी दिवेआगारच्या सुवर्णगणेश प्रतिमेचं प्रजून करण्यात आलं. दुपारपासूनच श्रीवर्धनच्या समस्त महिलावर्गाची पावलं वळली होती राऊत हायस्कूलच्या मैदानाकडे. महिलांसाठी हळदीकुंकू आणि विविध स्पर्धा तिथे पार पडल्या. महिलांच्या सामान्य ज्ञानाची परीक्षा घेणारा 'श्रीवर्धन सौ' ही स्पर्धा चांगलीच रंगली. शनिवार-रविवार असल्याने पर्यटकांचीही समुदकिनाऱ्यावर चांगलीच गदीर् झाली होती. किनाऱ्यावर उभारण्यात आलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर वडापाव, भेळ, सरबतं, कोथिंबीरवडी, अळूवडी, कोंबडी-वडे, सुरमई-बांगडा फ्राय, कोळंबी बिर्याणी अशी भरपूर रेलचेल होती. खवय्यांनी त्यावर मनसोक्त ताव मारला. समुदकिनारी मुलांसाठी असलेले खेळ खेळायला लहानांबरोबरच मोठ्यांचीही गदीर् दिसून येत होती. त्या दिवशी संध्याकाळी सुदेश भोसले यांच्या गाण्यांची आणि मिमिक्रीची मैफल रंगली. तिसऱ्या दिवशी सकाळी मॅरेथॉन आणि सायकल स्पर्धा, 'पतंग महोत्सव' असे भरगच्च कार्यक्रम पार पडला. सुरेखा पुणेकरांच्या ठसकेबाज लावणीच्या कार्यक्रमाने या फेस्टिवलची सांगता झाली.
Source :-Source :-
श्रीवर्धन बीच फेस्टिवलची सांगता
24th Jan 2011
खारा वारा, रम्य समुद्रकिनारा, कोळंबी बिर्याणी, सुरमई फ्रायपासून उकडीचे मोदक अशा पदार्थांची रेलचेल, पतंग फेस्टिवल आणि सुरेखा पुणेकर यांच्या ठसकेबाज लावण्या अशा भारलेल्या वातावरणात रविवारी 'श्रीवर्धन बीच फेस्टिवल'ची सांगता झाली. शुक्रवारी सुरू झालेल्या या फेस्टिवलला शनिवार आणि रविवारी तुडुंब गर्दी झाली.
अनिकेत तटकरे यांनी आयोजित केलेल्या या तीन दिवसीय फेस्टिवलसाठी श्रीवर्धनच्या समुद्रकिनारी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले होते, जागोजागी कमानी उभारण्यात आल्या होत्या. प्रवेशद्वारापाशीच उभ्या असलेल्या हत्तींच्या प्रतिकृती पर्यटकांचे लक्ष वेधून घेत होत्या. ज्येष्ठ कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी त्या कलाकृती साकारल्या आहेत. विविध वस्तू, खाद्यपदार्थ विकणारे जवळपास १०० स्टॉल्स येथे उभारण्यात आले होते. या स्टॉल्सवरही प्रचंड गर्दी दिसत होती. पहिल्या दिवशी अशोक हांडे यांच्या 'आवाज की दुनिया', तर दुसऱ्या दिवशी सुदेश भोसले यांच्या कार्यक्रमाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.
फेस्टिवलच्या शेवटच्या दिवशी सकाळी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यात २०० ते ३०० स्पर्धक सहभागी झाले. त्यानंतर रंगली ती सायकलिंग स्पर्धा. यात महिलांचा विशेष गट ठेवण्यात आला होता. दुपारनंतर समुदाकाठी रंगलेल्या पतंग महोत्सवाला विविध रंगांच्या आणि आकाराच्या पतंगांनी वेगळीच रंगत आली. सुरेखा पुणेकर यांच्या ठसकेबाज आणि बहारदार लावण्यांनी महोत्सवाची सांगता झाली. शनिवार आणि रविवारला जोडून आलेल्या या महोत्सवाला मुंबई-पुण्यासह श्रीवर्धनकरांचा उदंड प्रतिसाद लाभला. जलसंपदामंत्री सुनील तटकरे, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी या फेस्टिवलला उपस्थिती लावली.
Source :-श्रीवर्धन बीच फेस्टिव्हल
राष्ट्रीय एकात्मता साधणारा सोहळा!
आत्माराम मोरे
फेस्टिव्हल सीझनमध्ये अनेक महोत्सव, उत्सव साजरे केले जातात. श्रीवर्धनमध्ये पार पडलेला ‘बीच फेस्टिव्हल’ हा त्यापैकीच एक. त्याविषयी.. आज इथे मी उभा आहे. तो केवळ तुम्हा साऱ्या गुणीजनांचे ऋण मान्य करण्यासाठी, वडिलधाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी.. बस्स! आणि ते थांबले. त्यांचा कंठ दाटून आला होता. कशा आणि कोणत्या शब्दात कृतज्ञता व्यक्त करावी तेच त्यांना सुचत नव्हते. जवळजवळ दीड-दोन मिनिटे त्यात गेली. अशी अवस्था कधी त्यांची झाली नव्हती. उत्तम वक्ता म्हणूनच आजवर सारी जनता त्यांना ओळखत होती. त्या साऱ्यांना क्षणभर धक्काच बसला. प्रेक्षकांत चाललेली चलबिचल पाहताच त्यांनी स्वत:ला क्षणार्धात सावरले. माइक हाती धरला आणि पुन्हा पुढले अधुरे राहिलेले वाक्य उच्चारले. ते असे.. ‘तुमच्या अलोट प्रेमाने मी भारावून गेलोय. माझ्यावर असलेल्या अपार प्रेमाची मला साक्ष पटलेय हेच प्रेम, याच लाखमोलाच्या सदिच्छा माझ्या पाठिशी सदैव असूद्या. सुनील आणि त्यांचे सारे कुटुंब आजन्म ऋणी तुमचे राहतील. त्यांच्या या शब्दांच्या धुळवडीने हजारो जनसमुदायांच्या मनाचा वेध घेतला.
सबंध परिसर टाळ्यांच्या गजराने दणाणून गेला. हा प्रसंग आहे श्रीवर्धन बीच फेस्टिव्हल २०१० समारोपाचा! ज्यांच्या संकल्पनेतून बीच फेस्टिव्हलचे आयोजन केले गेले होते, त्यांचीच त्या दिवशी अशी अवस्था झाली होती. ते बरेच दडपणाखाली होते; ते दडपण होते जनतेने दिलेल्या प्रचंड पाठिंब्याचे. असे कधी घडेल असे त्यांना स्वप्नातही वाटले नव्हते. पण जनता जनार्दनाने तो चमत्कार केला खरा. हरिहरेश्वर, दिवेआगार आणि श्रीवर्धन अशा तीन ठिकाणी बीच फेस्टिव्हलचे तीन दिवस आयोजन नुकतेच करण्यात आले होते. त्या तिन्ही ठिकाणी या महोत्सवाला ग्रामीण भागातील जनतेपासून तो मुंबई, पेण, पनवेल, ठाणे येथील पर्यटकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला. तेच ओझे सुनील तटकरेंच्या डोक्यावर होते.
तीन दिवस तीन ठिकाणी चाललेल्या या सोहळ्याला सुमारे लाखभर रसिकप्रेक्षक, पर्यटकांनी आपली उपस्थिती नोंदविली. जे अपेक्षित नव्हते ते घडले. त्याने दस्तुरखुद्द सुनील तटकरे चकितच झाले. त्यांनी तसे माझ्याकडे बोलूनही दाखविले. म्हणूनच या जनता जनार्दनाला लाख-लाख सलाम. ते सहजच उद्गारले.. प्रारंभी त्यांच्या मनाची द्विधा अवस्था का झाली त्याचे कोडे उलगडले.
व्यासपीठ कोणतेही असो ते दणकेबाज भाषण करणार हे ठरलेले. गतवर्षीचे एक उदाहरण देतो, सोलापूर जिल्ह्य़ातील बीड मुक्कामी मराठी साहित्य संमेलन झाले. त्याच्या समारोपप्रसंगी त्यांनी विरोधी पक्षनेते, धुरंधर राजकारणी गोपीनाथ मुंडे यांच्यासमक्षच तोफ डागली. त्या वेळच्या भाषणात त्यांनी जी शब्दांची उधळण केली ती आजही आठवते. त्यांचे ते भाषण खूप गाजले-दर्दी राजकारणी म्हणून सुपरिचित असलेल्या गोपीनाथराव मुंडे यांनीदेखील दिलखुलासपणे त्यांच्या भाषणाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. भाषण संपल्यानंतर त्यांनी वडिलकीच्या नात्याने तटकरेंच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली होती. त्याचा विसर अद्याप पडलेला नाही. पडणारही नाही. इतके ते प्रभावीपणे बोलले.
कुलाबा जिल्हा परिषदेपासून त्यांची राजकीय वाटचाल सुरू झाली. तेव्हापासून प्राधान्याने त्यांनी अनेक योजना राबविल्या. पुढे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून प्रवेश झाला. अलीकडच्या काळात रोहे तालुक्याचा झालेला विकास डोळे दिपवणारा ठरलाय. दूरदृष्टीचा नेता असाच त्यांचा आज लौकिक आहे. त्या लौकिकाला कोठेही तडा जाऊ नये यासाठी ते सदैव दक्ष राहतात. रोहा हा त्यांचा मूळ मतदारसंघ बदलताना त्यांनी श्रीवर्धनला अधिक पसंती दिली. तेथील जनतेनेही भरघोस मतांनी त्यांना निवडून दिले. तेव्हाच त्यांनी अविकसित श्रीवर्धन तालुक्याचा चेहरा-मोहरा विकासकामांनी बदलण्याचा चंग बांधला. त्यातूनच ‘बीच’ फेस्टिव्हल २०१०चा जन्म झाला.
हरिहरेश्वर हे शहर दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. देशभरातून अनेक भाविक येथे येत असतात. दिवेआगारला सुवर्णमंदिर आणि प्रशस्त लाभलेला समुद्रकिनारा पाहण्यासाठी ठिकठिकाणाहून पर्यटक भाविक येत असतात. तर श्रीवर्धन हे शहर निसर्गाच्या सुंदर आविष्कारामुळे नटले आहे. म्हणूनच प्रथम ही तीन शहरे सुनील तटकरेंनी आपल्या डोळ्यासमोर ठेवून पर्यटनासाठी विकासकार्य कसे करता येईल हे पाहण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
कोकण भूमी प्रतिष्ठान आणि कोकण क्लब यांच्या सहकार्याने त्यांनी ‘बीच फेस्टिव्हल २०१०’चा पाया रचला. श्रीक्षेत्र हरिहरेश्वर ग्रामस्थांनी आयोजिलेल्या जनकल्याण यज्ञाने या फेस्टिव्हलचा शुभारंभ करण्यात आला. या रथयात्रेत सजविलेल्या बैलगाडय़ांतून अनेक मान्यवरांनी, पर्यटकांनी सफर केली. ठिकठिकाणी या रथयात्रेचे ग्रामस्थांनी पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे, युवा विचारवंत संत प.पू. भैय्यूजी महाराज आदी मान्यवरांनी आपली उपस्थिती नोंदविल्याने उद्घाटन सोहळ्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. शिडाची बोट, स्पीड बोट आणि मासेमारीची प्रात्यक्षिके पाहण्यासाठी दिवेआगार, श्रीवर्धनला प्रेक्षकांची तुफान गर्दी उसळली होती. स्थानिक कोळी भगिनींनी आपल्या प्रेमळ पाहुणचाराने सर्वाची मने जिंकली.
धर्माची, जातीपातीची बंधने झुगारून स्थानिक लोकांनी घेतलेला सहभाग, मुस्लिम समाजाचा (महिला-पुरुष) मिळालेला प्रचंड प्रतिसाद, साधली गेलेली राष्ट्रीय एकात्मता हे या फेस्टिव्हलची सर्वात मोठे यश सांगता येईल. आपण इथले नुसतेच रहिवासी नसून येथील संस्कृतीशी किती एकरूप झालो आहोत याचेच ्रदर्शन त्यांनी घडवून आणले. कळत-नकळत राष्ट्रीय एकात्मतेचा उद्देशही या फेस्टिव्हलने साध्य झाला. पर्यटनाच्या माध्यमातून उद्योगधंद्यांच्या किती नवनव्या संधी उपलब्ध होऊ शकतात याची जाणीव सर्व ग्रामस्थांना झाली. सर्वच राजकीय पक्षांनी आपापसांतील दुही विसरून ग्रामविकासासाठी, जनहितासाठी कामे केली तर भारताला येत्या काही वर्षांत महासत्ता बनण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही याचा प्रत्यय, या फेस्टिव्हलच्या निमित्ताने आला. सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सहकार्याने कामे केली. यात प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल तो सुनील तटकरे यांचा. त्यांनी आपली सर्व राजकीय ताकद हा महोत्सव सर्वतोपरी यशस्वी करण्यासाठी पणाला लावली होती. गोवा, केरळ या राज्यांनी पर्यटनाला अधिक प्राधान्य दिल्याने त्यांच्या महसुलात दरवर्षी प्रचंड भर पडत आली आहे. पर्यटकांचा हा ओघ महाराष्ट्राकडे वळावा ही दूरदृष्टी नजरेसमोर ठेवून ऊर्जा व नियोजनमंत्री सुनील तटकरे यांनी पहिले पाऊल उचलले आहे. त्यांचा पहिला प्रयत्न निश्चितच यशस्वी ठरलाय. कोकण भूमी प्रतिष्ठान, कोकण क्लब यांच्या सहकार्याने तीन दिवसांचा बीच फेस्टिव्हल आयोजिला गेला. युवा नेते अनिकेत तटकरे यांनी महोत्सवातील उणीवा कशा कमी करता येतील यासाठी सातत्याने लक्ष घातले. पहिल्या प्रयत्नात काही त्रुटी राहून गेल्या आहेत याची प्रांजळ कबुली देऊन त्या दुरुस्त केल्या जातील याची जाणीव त्यांनी आभारप्रदर्शन करताना दिली. हेच त्यांचे राजकीय कौशल्य ठरावे.
Source :- Loksattaश्रीवर्धन बीच फेस्टिव्हल
22nd Jan 2011
निसर्गसौंदर्याची मुक्त उधळण असलेल्या कोकणच्या भूमीत एकापेक्षा एक सुंदर समुदकिनारे आहेत. रुपेरी वाळू, निळंशार पाणी हे सारं काही अनुभवायचा असेल तर कोकणात धाव घेण्याशिवाय पर्यायच नाही. श्रीवर्धन, दिवेआगार, हरिहरेश्वर इथल्या बीचेसचं सौंदर्य आणि लोककलांचा महोत्सव अनुभवण्याची संधी २३ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या 'श्रीवर्धन बीच फेस्टिव्हल'च्या निमित्ताने पर्यटकांना मिळेल
निसर्गाचा समृद्ध खजिना म्हणजे कोकण. कोकणात येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. कोकणात येणाऱ्या पर्यटकांना सर्वात मोठं आकर्षण असते येथील रुपेरी सागर किनाऱ्यांचे. डहाणूपासून ते वेंगुर्ल्यापासून अनेक गावे समुदकिनारी आहेत. कोकणात सागरी पर्यटन विकसित व्हावे या उद्देशाने २३ ते २५ जानेवारीदरम्यान 'श्रीवर्धन बीच फेस्टिवल'चं आयोजन करण्यात आलं आहे.
श्रीवर्धन तालुक्यात हरिहरेश्वर, मारळ, श्रीवर्धन, शेरवाडी, दिवेआगार, आदगाव, सवेर् असे सुंदर समुदकिनारे आहेत. याशिवाय बागमाडला, दिघी व श्रीवर्धनला नितांत संुदर असे बॅकवॉटर्सही आहेत. श्रीवर्धन तालुक्यात कुसुमादेवी, देवखोल अशी अनेक पर्यटनस्थळंही आहेत. श्रीवर्धन, दिवेआगार, हरिहरेश्वर या तीन सागरकिनाऱ्यांवर दररोज सायंकाळी ६ ते १० या वेळेत कोकणातील लोककलांचा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. जाखडी, शंकासूर, पालखीनृत्य, गोमूचा नाच, डेरा, कोळीनृत्य, पदूमपाक अशा अनेक आकर्षक लोककला पर्यटकांना या महोत्सवात पहायला मिळतील. महोत्सव म्हटला की खाद्यसंस्कृतीही आलीच. कोळी, भंडारी, ब्राम्हणी, आगरी प्रकारचे अनेक खाद्यपदार्थ महोत्सवात मिळणार आहेत. श्रीवर्धन तालुक्यातील कलेला वाव देणारी आर्ट गॅलरी यावेळी उभारण्यात येणार आहे. समुदकिनारा, डॉल्फीनदर्शन, शिडाच्या बोटीतून समुद सफर, मासेमारीचा अनुभव अशा अनेक गोष्टी स्थानिक कोळी बांधवाच्या मदतीने करण्यात येणार आहेत. समुदकिनाऱ्यावरील वाळूत पॅरासेलिंग करून अवकाशातून श्रीवर्धनचे सृष्टीसौंदर्य पाहण्याची संधी पर्यटकांना मिळू शकेल. पर्यटकांच्या मनोरंजनासाठी सिनेकलाकारांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहेत. परिसरातील निसर्गरम्य गावांना भेट, आंबा-काजूच्या बागा पाहण्याची संधी, बैलगाडीतून सफर, जंगल भ्रमंती, पशू-पक्षी निरीक्षण, बॅकवॉटरची सफर पर्यटकांना मिळेल. ग्रामीण जीवनाचा अनुभव घेण्याची इच्छा असलेल्या पर्यटकांची व्यवस्था गावांतील शेतकऱ्यांच्या घरात करण्यात येणार आहे. अर्थ व नियोजन मंत्री सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीवर्धन नगरपरिषद, दिवेआगार व हरिहरेश्वर ग्रामपंचायतीने या महोत्सवाचं आयोजन केलं असून 'कोकण भूमी प्रतिष्ठान' या महोत्सवाचं संयोजन करीत आहे. संपर्क - ९७०२०३४४३० / ९८६०११५२१२ / २७४६७०४४
Source :-आजपासून साकारणार ‘श्रीवर्धन बीच फेस्टिव्हल’
जयंत धुळप ,अलिबाग,२० जानेवारी
पित्याची कल्पकता, पुत्राची सुयोग्य अंमलबजावणी आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग यांचा आगळा मिलाफ उद्यापासून पुढील तीन दिवस ‘स्वर्गभूमी’, ‘रमणीय’ या विशेषणांनी युक्त अशा पेशव्यांच्या पदस्पर्शाने पुनित तर ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरिहरेश्वरच्या पवित्र किनाऱ्यानजिक श्रीवर्धन समुद्र किनारी संपन्न होणाऱ्या ‘श्रीवर्धन बीच फेस्टिव्हल’च्या निमित्ताने अनुभवास येणार आहे. कोकणच्या किनारपट्टीतील देवभूमी हरिहरेश्वर, स्वर्गभूमी श्रीवर्धन आणि स्वर्णभूमी दिवेआगर या अनन्य साधारण ऐतिहासिक महत्वप्राप्त नारळी फोफळीच्या शहरांमध्ये संपन्न होणाऱ्या या ‘श्रीवर्धन बीच फेस्टिव्हल’ ची मूळ कल्पना जलसंधारण मंत्री सुनिल तटकरे यांची़ येथील आमजनतेसाठी हा ‘फेस्टिव्हल’ त्यांनी येथे सुरू केला आणि कला, संस्कृती, संगीत, संवाद, स्नेह आणि अनन्यसाधारण उत्साह यांची पर्वणीच येथील लोकांना मिळाली.
शुक्रवारी सकाळी नऊ वाजता ‘बाजीराव मस्तानी फेम’ अंगद म्हसकर आणि प्राची म्हात्रे यांच्या हस्ते श्री हरिहरेश्वराचे पूजन करून फेस्टिव्हलच्या उपक्रमांचा शुभारंभ होईल. ११ वाजता स्वर्गभूमी श्रीवर्धन नगरी ‘शोभायात्रे’ने फुलून जाणार आह़े दुपारी साडेबारा वाजता श्री सोमजाई देवी मंदिर दर्शन होईल तर दुपारी चार वाजता श्रीवर्धन बीचवरच आयोजित शालेय विद्यार्थ्यांच्या चित्रकला स्पध्रेतून कलाविष्कार कुंचल्याने साकारेल.\ संध्याकाळी पाच वाजता सुनील तटकरे यांच्या हस्ते या फेस्टिव्हलचे उद्घाटन होईल़ त्यावेळी विधान परिषद सदस्य आमदार अनिल तटकरे, कर्जतचे आमदार सुरेश लाड, रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष वसंत ओसवाल आदी उपस्थित राहाणार आह़े \ सांस्कृतिक मनोरंजनाची पहिली पर्वणी अशोक हांडे यांच्या ‘आवाज की दुनिया’ या सांस्कृतिक कार्यक्रमातून संध्याकाळी सात वाजता श्रीवर्धनकरांना उपलब्ध होणार आह़े
शनिवारी सकाळी दिवेआगर सुवर्णगणेश पूजन\, महिलांचे हळदीकुंकू आणि कला स्पर्धा, दुपारी कोकणातील पारंपारिक लोककलांचा आविष्कार तर संध्याकाळी सुदेश भोसले यांच्या ‘सुदेश भोसले संगीत रजनी’ची दुसरी पर्वणी उपलब्ध होणार आहे. तिसऱ्या दिवशी म्हणजे २३ जानेवारी या अखेरच्या दिवशी सकाळी मॅरेथॉन स्पर्धा, सायकल स्पर्धा, दुपारी पतंग फेस्टिव्हल आणि कोकणातील पारंपारिक लोककला सादर होतील तर तिसरी पर्वणी संध्याकाळी सात वाजता सुरेखा पुणेकर यांच्या ‘नवरंगी रंग’ या आगळया कार्यक्रमातून सर्वाना अनुभवण्यास मिळणार आहे.
Source :- Loksattaबीच फेस्टिव्हलसाठी श्रीवर्धन सज्ज
20th Jan 2011
श्रीवर्धन - सुंदर आणि स्वच्छ समुद्रकिनारे, किनाऱ्याला समांतर घनदाट झाडी, निसर्गाने मुक्तपणे उधळलेले वैभव अशी पार्श्वभूमी लाभलेल्या स्वर्गभूमी श्रीवर्धनमध्ये शुक्रवारपासून (ता.21) तीन दिवस श्रीवर्धन बीच फेस्टिव्हल सुरू होत आहे. या फेस्टिव्हलच्या निमित्ताने श्रीवर्धन शहर सजले असून मोठ्या संख्येने पर्यटक आताच दाखल झाले आहेत. "सकाळ' या फेस्टिव्हलचे माध्यम प्रायोजक असून पालकमंत्री सुनील तटकरे यांच्या संकल्पनेतून हा फेस्टिव्हल साकार होत आहे.

श्रीवर्धन बीच फेस्टिव्हल(Shrivardhan Beach Festival)
मागील वर्षी हा फेस्टिव्हल हरिहरेश्वर, श्रीवर्धन व दिवेआगर या तीन ठिकाणी साजरा केला होता; परंतु या वेळेला हा फेस्टिव्हल श्रीवर्धन किनाऱ्यावरच करण्याचे ठरविण्यात आले आहे. यामुळे येणाऱ्या पर्यटकांना त्या ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमांचा चांगल्या प्रकारे आस्वाद घेता येईल, असे आयोजकांचे म्हणणे आहे. या बीच फेस्टिव्हलच्या निमित्ताने श्रीवर्धमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण असून शहरातील स्वच्छता व साफसफाईचे काम नियमित सुरू आहे. शालेय विद्यार्थ्यांनी अनेक रस्त्यांवर मनमोहक रांगोळ्यादेखील काढल्या आहेत. उत्सवाच्या निमित्ताने येणाऱ्या पर्यटकांच्या व भाविकांच्या स्वागतासाठी सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. बीच फेस्टिव्हलच्या स्थळी अनेक खाद्य पदार्थांचे स्टॉल्स लावण्यात येणार असून अनेक स्टॉलधारकांनी फेस्टिव्हल सुरू होण्याच्या अगोदरच जय्यत तयारी सुरू केली आहे. ज्या ठिकाणी फेस्टिव्हलचा कार्यक्रम होणार आहे. त्या ठिकाणी भव्य रंगमंच उभारण्यात आला असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोषणाई व सजावट करण्यात आली आहे. फेस्टिव्हलचे मुख्य आकर्षण हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीतील नायिका ऊर्मिला मातोंडकर असणार आहे. फेस्टिव्हलचे उद्घाटन ऊर्मिला मातोंडकरच्या उपस्थितीत होणार आहे. फेस्टिव्हलच्या निमित्ताने श्रीवर्धन शहराचे रूपच पालटविण्यात येत आहे. फेस्टिव्हलची सर्व जय्यत तयारी झाली असून अनिकेत तटकरे या सर्व तयारीवर जातीने देखरेख करीत आहेत
Source :-
Sakalपळस्पे ते इंदापूर चौपदरीकरणाला मंजुरी ......बांधकाममंत्री भुजबळ यांची माहिती
रोहा, दि. ११ (वार्ताहर) - कोकणातील महत्त्वाचा समजला जाणारा मुंबई-गोवा महामार्गावरील पळस्पे ते इंदापूर हा पहिला टप्पा मंजूर झाला आहे. पुढच्या टप्प्यासाठी सर्व्हेनंतर हे कामही मार्गी लागेल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
रोहे येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. जलसंपदामंत्री सुनील तटकरे, आ. अनिल तटकरे, पंचायत समिती सभापती सदानंद गायकर, नगराध्यक्ष अवधूत तटकरे, मंगेश दांडेकर, मधुकर पाटील, प्रदीप चोरगे, मिलिद कुलकर्णी या वेळी उपस्थित होते. रस्ता निर्मितीमध्ये ठेकेदारांनी पैसे ओतलेले असतात आणि रस्ता दुरुस्तीही त्यांनीच करायची असते, म्हणूनच टोल घेतला जातो असे भुजबळ यांनी सांगितले. बांधकाम खात्याने कामाचा दर्जा राखावा, पुढचे पाठ मागचे सपाट असे काम करू नये. बांधकामाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्याने घेतली पाहिजे, असे ते म्हणाले. पळस्पे ते इंदापूर या मुंबई-गोवा मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम दोन महिन्यात सुरू होईल, असे मोघमपणे सांगितले. त्यामुळे त्यांच्या भाषणातून या बांधकामाबाबत निश्तित असे काही कळू शकले नाही. सुनील तटकरे यांनी आपल्या भाषणात भुजबळ यांनी नाशिकप्रमाणे रायगड जिल्ह्याला न्याय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करीत १९६१ ते १९८१ या काळात बॅ. अंतुले यांच्याकडे कै. द.ग. तटकरे यांनी सातत्याने पाठपुरावा करून तालुक्यात रस्त्यांचे जाळे विणले तसेच शरद पवारांच्या माध्यमातूनही अनेक विकासकामे केल्याचे या वेळी नमूद केले.
Source :- Lokmatजलसंपदामंत्री घेणार सकारात्मक भूमिका......भातसा प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी
भातसानगर, दि. ६ (वार्ताहर) - मुंबईतील दीड कोटी जनतेची तहान भागविणाऱ्या भातसा धरणामुळे विस्थापित प्रकल्पग्रस्तांचे ४२ वर्षांनंतरही पुनर्वसन झालेले नाही. इतकेच नव्हे तर अनेक कुटुंबे विस्थापनामुळे धुळीस मिळाली आहेत. यासंबंधी जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी भातसा धरणामुळे विस्थापित झालेल्या १४२ कुटुंबांसाठी शासकीय स्तरावर सकारात्मक भूमिका घेऊन त्यांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सूतोवाच भातसा धरण भेटीत व्यक्त केले.
जलसंपदा विभागाचा अधिभार हाती घेतल्यानंतर प्रथमच त्यांनी भातसा धरणाला भेट देऊन पाहणी केली.
१९६९ मध्ये मुंबईची तहान भागविण्यासाठी भातसा व चोरणा नदीवर साजिवलीजवळ भातसा धरणाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर, या धरणामुळे घोडेपाऊल, पाचिवरे व पाल्हेरी या तीन गावांतील सुमारे १२७ कुटुंबे विस्थापित झाली. त्यातील आजमितीस शासनाने ४२ वर्षांनंतरही १४२ जणांचे रीतसर पुनर्वसन न करून नोकऱ्याही दिलेल्या नाहीत. यासंबंधी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी लवकरच यासंबंधी सकारात्मक भूमिका घेऊन हा प्रश्न मार्गी लावू, असे सांगितले. तसेच बिरवाडी सिचन योजनेत ठेकेदाराच्या हलगर्जीपणाची दखल घेऊन २०११ पर्यंत हे काम पूर्ण न झाल्यास ठेकेदारावर कारवाई करण्याचे सूतोवाच केले. धरणाच्या सुरक्षेबाबत शासन गांभीर्याने विचार केला असून केंद्र सरकारच्या साहाय्याने प्रत्येक धरणावर सुरक्षेबाबत दक्षता घेण्यात येईल व कडक सुरक्षा राहील, असे सांगितले. भातसा धरणाचा रखडलेल्या डाव्या कालव्यासंबंधी शासनाने ठोस भूमिका घेतली असून धरणासाठी आवश्यक असलेली खाजगी व वनजमिनीची केंद्र सरकारकडे अंतिम मान्यतेसाठी आवश्यक असलेली भरणा करावयाची ७६.०३ कोटीची रक्कम अल्पकाळात भरण्यात येईल, असे सांगितले
Source :- Lokmatतटकरेंना कोणते खाते मिळणार
मालवण - कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या अर्थमंत्री सुनील तटकरे यांना आता कोणत्या मंत्रिपदाची "लॉटरी' लागणार, याकडे कोकणवासीयांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादीच्या सहा आमदारांसह मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा नुकताच शपथग्रहण सोहळा झाला. या अकरा जणांच्या चमूत श्री. तटकरे कोकणातील एकमेव आमदार आहेत. राणेंच्या आधी त्यांनी शपथ घेण्याचा मान मिळविला आहे. श्री. राणे यांचा मंत्रिमंडळातील समावेश निश्चित आहे; मात्र श्री. तटकरे हे सध्या राणेंच्या बरोबरीने कोकणात वर्चस्व प्रस्थापित करून आहेत. त्यांना अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात अर्थ खाते मिळाले होते. अर्थमंत्री या नात्याने तटकरे यांनी कोकणच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. यात कोकणातील नद्यांमधील गाळ उपसण्यासाठी चार ट्रेझर देण्याचा घेतलेला निर्णय महत्त्वपूर्ण ठरला आहे. बंदर विकासासाठीही त्यांनी निर्णय घेतले आहेत. अर्थमंत्री म्हणून राज्याच्या राजकारणात छाप उठविणाऱ्या तटकरे यांना राष्ट्रवादीने पहिल्या दहा जणांमध्ये शपथ देऊन कोकणचा "बॅकलॉग' पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. आता तटकरेंच्या पदरात कोणते मंत्रिपद पडते, याकडे त्यांच्या समर्थकांचे लक्ष लागले आहे. त्यांना ऊर्जा किंवा अर्थ ही खाती मिळू शकतात. ऊर्जा खाते सध्या अजित पवारांकडे आहे. तटकरे हे पवार यांच्या गोटातील समजले जातात. पवार यांना उपमुख्यमंत्री करण्यासंदर्भातील आमदारांची बैठकही तटकरे यांच्याच निवासस्थानी झाली होती. एकूणच तटकरे व पवार यांची जवळीक पाहता त्यांना पुन्हा एकदा महत्त्वाचे खाते मिळण्याची शक्यता आहे. तटकरेंजवळ निवडणुकीपूर्वी ऊर्जा खाते होते. ऊर्जामंत्री म्हणूनही त्यांनी सकारात्मक काम केले होते. कोकणात औष्णिकविरोधी वातावरण होते. अशा स्थितीतही श्री. तटकरे या वादात कुठे अडकल्याचे दिसले नव्हते. त्यामुळे पुन्हा ऊर्जा की अर्थ खाते मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Source :- eSakal – GlobalMarathi.comMinisters Taking Oath
Photo – Gajanan Gurye 11 November 2010

Source :- Photo – Gajanan Gurye
मराठा शिक्का पुसण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न.....चेहरे मात्र तेच - झुकते माप पश्चिम महाराष्ट्राला
Lokmat, यदु जोशी, 12/11/2010
मुंबई, दि. ११ - उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ कॅबिनेट मंत्र्यांनी आज पहिल्या टप्प्यात शपथ घेतली. या दहा जणांपैकी केवळ तीन मराठा आहेत तर सात बिगरमराठा. मराठा वर्चस्व असलेला पक्ष हा ठप्पा पुसण्याचा प्रयत्न पहिल्या टप्प्यात पक्षाने केला असला तरी एकाही नवीन चेहऱ्याला संधी दिलेली नाही.
अजित पवार हे तुलनेने तरुण उपमुख्यमंत्री झाल्यानंतर राष्ट्रवादीत नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल, ही अपेक्षा किमान पहिल्या टप्प्यात तरी फोल ठरली आहे. आज शपथ घेतलेले सगळे मंत्री पक्षात आता प्रस्थापित मानले जातात. छगन भुजबळ यांना उपमुख्यमंत्रीपद गमवावे लागल्याने आणि त्यांच्या जागी अजित पवार आल्याने ओबीसी समाजात चांगला संदेश गेला नाही, हे लक्षात घेऊन आज मुद्दाम बिगरमराठा मंत्र्यांना आधी शपथ देण्यात आली, असे मानले जात आहे.
स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच आर.आर. पाटील व जयंत पाटील हे तिघेच मराठा समाजाचे आहेत. छगन भुजबळ (माळी), गणेश नाईक (आगरी), जयदत्त क्षीरसागर (तेली), मनोहर नाईक (बंजारा), डॉ. विजयकुमार गावित (आदिवासी), प्रा. लक्ष्मण ढोबळे (मातंग), सुनील तटकरे (गवळी) हे बिगरमराठा मंत्री आहेत. जातीय सलोखा आणि संतुलन राखण्याचा आपला प्रयत्न असेल, असे अजित पवार यांनी काल त्यांची निवड होताच म्हटले होते. त्याचा प्रत्यय म्हणून की काय राष्ट्रवादीने आज बिगरमराठा मंत्र्यांना जादा संधी दिली. मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये मराठा समाजाला जादा संधी असेल. तसेच, काही नवीन चेहरे दिले जातील, असे सूत्रांनी सांगितले. विभागीय समतोलाचा विचार केला तर विदर्भ, मराठवाडा आणि कोकण व नवी मुंबईला प्रत्येकी १, उत्तर महाराष्ट्राला २, पश्चिम महाराष्ट्राला ४ अशी राष्ट्रवादीच्या १० मंत्र्यांची विभागणी होते. राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये प. महाराष्ट्राचा अर्थातच वरचष्मा आहे.
अशोकराव चव्हाण मंत्रिमंडळातील अनिल देशमुख, राजेश टोपे, रामराजे निबाळकर, बबनराव पाचपुते, हसन मुश्रीफ या राष्ट्रवादीच्या पाच कॅबिनेट मंत्र्यांना आज पहिल्या टप्प्यात संधी मिळाली नाही. विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील आणि माजी मंत्री नवाब मलिक यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी चर्चा होती. मात्र त्यांना संधी मिळू शकलेली नाही.
Source :- Lokmat
Prithviraj Faces First Challenge
Hindustan Times 12/11/2010

Source :- Hindustan Times
Sakaal 12/11/2010

Source :- Sakaal Times
वड्ड समाजाच्या विकासासाठी प्रयत्¬न करु - सुनील तटकरे
कोल्हापूर दि.८-वड्ड समाजाच्या विकासासाठी शास नातर्फे नि धी मिळवू न देण्यासाठी प्रयत्न करु,असे प्रतिपाद न राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुनील तटकरे यां नी केले.
कागल येथील वड्डवाडी वसाहतीमध्ये बांधलेल्या वड्डवाडी सांस्कृतिक भव नाचे उद्घाट न वित्त व नियोज न मंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते झाले,त्यावेळी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी कामगार मंत्री हसन मुश्रीफ होते.यावेळी आमदार के.पी.पाटील,श्रीमंत संभाजीराजे छत्रपती,नगराध्यक्ष अशोकराव जकाते व अन्य मा न्यवर उपस्थित होते.
यावेळी श्री.तटकरे म्हणाले,उपेक्षितांच्या कल्याणासाठी राजर्षी शाहूं नी लढा दिला. त्यांच्याच विचारांचा आदर्श डोळयासमोर ठेवू न श्री.मुश्रीफ यांचे कार्य सुरु आहे.कागलमधील विविध विकास कामांचा आढावा घेऊन श्री.तटकरे म्हणाले, कागल एक रोल मॉडेल म्हणू न नावाजले जाईल.जीव नभर निरंतर कष्ट करणार्या वडार समाजाला विविध सुविधा पुरविणे गरजेचे आहे.यादृष्टी ने दहा लाख रुपये खर्चू न बांधलेल्या वड्डवाडी सांस्कृतिक भव नाचा लाभ निश्चितच या समाजबांधवांना होईल. मिळालेल्या संधीचे सो ने करण्याच्या हेतूने गरीबांसाठी सुविधा उपलब्ध करु न देण्यासाठी प्रयत् न करण्यात येतील.
अध्यक्षीय भाषणात हस न मुश्रीफ म्हणाले,कागलच्या विकासाबरोबरच येत्या काळात जिल्ह्याच्या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहू.वड्ड समाज,गोसावी समाजाबरोबरच गरीबां ना आ नंद देण्यासाठी आणि त्यांच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी कार्यरत राही न असे सांगून श्री.मुश्रीफ म्हणाले,गोरगरीबांच्या कल्याणासाठी कितीही संकटां ना सामोरे जावे लागले तरी न डगमगता त्यां ना आवश्यक त्या सुविधा मिळवू न देण्यात येतील.
कार्यक्रमा नंतर कागल नगरपरिषदेतर्फे करण्यात आलेल्या विविध विकास कामांची पाहणी श्री.तटकरे यांनी केली. यावेळी राजकीय नेते,पदाधिकारी,अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Source :- http://diokolhapur.blogspot.com – Posted by जिल्हा माहिती अधिकारीमराठी शाळांना परवानगीबाबत सकारात्मक निर्णय घेऊ : तटकरे
लोकमत - 06/09/2010
''गेल्या ५० वर्षात राज्यात जेवढ्या मराठी शाळांना परवानगी देण्यात आली त्या शाळा विद्यार्थी संख्येनुसार योग्य प्रमाणात आहेत. गेल्या वर्षी कायम विना अनुदानित तत्त्वावर शासनाने ३ ते ४ हजार शाळांना परवानगी दिली होती. पण काही काळानंतर या शाळा अनुदानाची मागणी करू लागल्या. दुसरीकडे इंग्रजी माध्यमाच्या शाळा शासनाकडून अनुदान घेत नाहीत. हे जरी खरे असले तरी शासन मराठी माध्यमाच्या शाळांवर अन्याय होईल, असा निर्णय घेणार नाही.
-सुनिल तटकरे
पुणे, दि. ५ (प्रतिनिधी) : ''मराठी शाळांना परवानगी दिल्याने शासनाच्या तिजोरीवरील भार वाढेल, हे खरे असले तरी त्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळांना परवानगी नाकारता येणार नाही. आराखडा तयार करून या विषयी शासन सकारात्मक निर्णय घेईल,'' असे आश्वासन राज्याचे अर्थ आणि नियोजन मंत्री सुनील तटकरे यांनी दिले.
'माईर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट'च्या सहाव्या तुकडीचे उदघाटन तटकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी वरील आश्वासन दिले. राज्य शासनाने मराठी माध्यमांच्या शाळांना परवानगी नाकारल्याच्या संदर्भात काल राज्यात विविध ठिकाणी आंदोलन झाले. याविषयी प्रश्न विचारला असता तटकरे म्हणाले, ''गेल्या ५० वर्षात राज्यात जेवढ्या मराठी शाळांना परवानगी देण्यात आली त्या शाळा विद्यार्थी संख्येनुसार योग्य प्रमाणात आहेत. गेल्या वर्षी कायम विना अनुदानित तत्त्वावर शासनाने ३ ते ४ हजार शाळांना परवानगी दिली होती. पण काही काळानंतर या शाळा अनुदानाची मागणी करू लागल्या. दुसरीकडे इंग्रजी माध्यमाच्या शाळा शासनाकडून अनुदान घेत नाहीत. हे जरी खरे असले तरी शासन मराठी माध्यमाच्या शाळांवर अन्याय होईल, असा निर्णय घेणार नाही. मराठी माध्यमाच्या नवीन शाळांना मान्यता देण्यासाठी आवश्यक आराखडा तयार करून योग्य तो निर्णय होईल.''
राष्ट्रकुल युवा स्पर्धेचे लेखापरीक्षण
राष्ट्रकुल युवा स्पर्धेच्या गोंधळाबाबत बोलताना ते म्हणाले, ''स्पर्धेसाठी स्टेडियमची उभारणी, खेळाडूंवर झालेला खर्च या सगळ्या गोष्टींचा तपशील घेतला जाईल. यावर शासनाच्या वतीने लेखापरीक्षण होईल. जो पर्यंत शासन स्तरावर समाधान होत नाही तो पर्यंत सर्व तपशिलांवर अभ्यास करण्याची प्रक्रिया सुरू राहिल.'' या स्पर्धेसाठी शासनाने निधी दिला आहे, त्यामुळे शासनाकडे सर्व तपशील सुपूर्द करावाच लागेल. अर्थमंत्री म्हणून आपण स्वत: या कामात जातीने लक्ष घालत असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या २० दिवसात सर्व तपशील शासनाकडे येतील. त्यानंतर पुढची पाऊले उचलली जातील, असे ते म्हणाले.
साहित्य संमेलनाची शिल्लक रक्कम महाकोषात जमा करावी
साहित्य संमेलनात झालेल्या खर्चाच्या लेखापरीक्षणाबद्दल बोलताना तटकरे म्हणाले, ''साहित्य संमेलनाचे स्वरूप बघता या संमेलनाला शासना व्यतिरिक्त आणखीनही काही संस्था निधी देतात. त्यामुळे गोळा झालेली रक्कम जास्त आहे. संमेलनासाठी झालेला खर्च आणि मिळालेले अनुदान बघता बरीच रक्कम शिल्लक राहिल्याचे समजते. ही रक्कम महा कोषात जमा करावी. जेणे करून साहित्य क्षेत्रातील इतर कार्यासाठी त्या रकमेचा उपयोग होऊ शकेल.'' 'पुण्यभूषण फौंडेशन' ने जमा झालेल्या निधीचा चोख हिशोब शासनाला द्यावा, असे ते म्हणाले. संस्थेच्या वतीने देण्यात आलेल्या तपशिलात काही गैर आढळल्यास त्याचे शासकीय पातळीवर लेखापरीक्षण होईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
मुंबईसाठी राज्य शासनाची ९,६५४ कोटींची तरतूद - तटकरे
मुंबई, १६ एप्रिल / खास प्रतिनिधी
दोन वर्षांनी होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल आतापासूच वाजू लागले असून, मुंबईकडे आपण जास्तीत जास्त लक्ष देतो हे दाखविण्याचा प्रयत्न सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सुरू केला आहे. राज्य शासन मुंबईकडे दुर्लक्ष करते, असा आरोप शिवसेना-भाजपच्या नेत्यांकडून करण्यात येत असला तरी चालू आर्थिक वर्षांत राज्य शासनाने मुंबईच्या विकासासाठी ९,६५४ कोटी रुपयांची तरतूद केल्याचे वित्तमंत्री सुनील तटकरे यांनी विधानसभेत आज सांगितले. वित्त व नियोजन विभागाच्या मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना तटकरे यांनी, मुंबईच्या विकासासाठी राज्य शासन गंभीर आहे हे स्पष्ट केले. मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या माध्यमातून या वर्षांत सुमारे सहा हजार कोटींची कामे केली जाणार आहेत. मेट्रो रेल्वे, म्हाडा आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळ सुमारे तीन हजार कोटींचे प्रकल्प राबविणार आहे. मुंबईतील पावसाळी पाण्याच्या निचऱ्यासाठी राबविण्यात येणाऱ्या बिमस्ट्रॉवेड प्रकल्पासाठी २०० कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहितीही तटकरे यांनी दिली. मानवी निर्देशांक सरासरीपेक्षा कमी असलेल्या १७२ तालुक्यांच्या विकासासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात खास बाब म्हणून ५०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. देशाचे सरासरी दरडोई उत्पन्न ३३,७८० रुपये आहे
महाराष्ट्रातील १६ जिल्ह्यांमध्ये दरडोई उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा कमी आहे. तरीही पुढील पाच वर्षांंमध्ये राज्यातील सर्वांचे दरडोई उत्पन्न एक लाख रुपये करण्याचे उद्दिष्ट साध्य केले जाईल, असे तटकरे यांनी सांगितले. राज्यातील ७३ डोंगरी तालुक्यांसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करण्यात येत असल्याचे तटकरे यांनी जाहीर केले. त्यानुसार तालुक्यांसाठी ६० लाखांऐवजी ८० लाख रुपये तर उपविभागासाठी ३० लाखांची तरतूद वाढवून ती ४० लाख रुपये करण्यात येणार आहे. राज्य शासनाचा चालू आर्थिक वर्षांत खर्च एक लाख चार हजार कोटी रुपये आहे. त्यातील सुमारे ८४ हजार कोटी वेतन आणि विविध देण्यांवरच होतो. शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन (४२,८५१ कोटी), निवृत्ती वेतन (८,८८९ कोटी), व्याज (१६,४६९ कोटी), शेतकऱ्यांसाठी देण्यात येणारी वीज सवलत (५,२१४ कोटी ), कर्जाची परतफेड (७८०८ कोटी), शिष्यवृत्ती (७९३ कोटी), विविध अनुदाने (३४३१ कोटी) असा खर्च होणार आहे.
Source :- Loksatta
१६ एप्रिल २०१०




शिक्षणसेवकांचे मानधन वाढवण्याचे ग्रामविकास मंत्र्यांचे आश्वासन
४ एप्रिल २०१०
नाशिक, दि. ३ (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या रोहा येथे झालेल्या राज्यस्तरीय अधिवेशनात शिक्षणसेवक, वस्तीशाळा शिक्षकांच्या मानधनात वाढ करण्याबरोबरच अन्य मागण्या सोडविण्याचे आश्वासन ग्रामविकास मंत्री जयंत पाटील व वित्तमंत्री सुनील तटकरे यांनी दिल्याची माहिती समितीने पत्रकान्वये दिली आहे.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे १४ वे त्रैवार्षिक अधिवेशन रायगड जिल्ह्यातील रोहा येथे पार पडले. या अधिवेशनात १९७२ नंतर रुजू झालेल्या अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षकांना सेवानिवृत्ती योजना लागू करणे, पहिली ते चौथीच्या वर्गांसाठी पदवीधर शिक्षकांची नेमणूक करणे, शिक्षकांना सहावा वेतन आयोग लागू करणे आदि प्रमुख मागण्या सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले. महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीच्या वेबसाईटचे उदघाटन ग्रामविकास मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. राज्य शिक्षक समितीच्या अध्यक्षपदी पुणे येथील नाना जोशी, उपाध्यक्षपदी काळू बोरसे, कार्याध्यक्षपदी शिवाजीराव साखरे, सरचिटणीसपदी जगन्नाथ सुर्वे तर राज्य संफप्रमुखपदी संजय कळंबकर यांची निवड करण्यात आली.
नाशिक जिल्ह्यातून सहा हजाराच्या आसपास शिक्षक या अधिवेशनात सहभागी झाले होते. अधिवेशनासाठी रामदास ह्याळीज, आनंदा कांदळकर, पांडुरंग कर्डिले, देवाजी गांगुर्डे, प्रदीप आगासे, रामदास देवरे आदि उपस्थित होते.
Source :-

बेदाण्याचा व्हॅट रद्द होणार : शरद पवारांची अर्थमंत्र्यांना सूचना सभापती प्रकाश जमदाडे यांची माहिती
४ एप्रिल २०१०
सांगली, दि. ४ (प्रतिनिधी) : बेदाण्यावर लावण्यात आलेला पाच टक्के व्हॅट रद्द करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला यश मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी अर्थमंत्री सुनील तटकरे यांना तशी सूचना दिली असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश जमदाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, जमदाडे आज नेत्यांना भेटण्यासाठी शिष्टमंडळासह मुंबईला रवाना झाले.
जमदाडे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष शरद शहा, बाजार समितीचे संचालक राजेंद्र कुंभार, मारुती पवार उपस्थित होते. जमदाडे म्हणाले की, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची आमदार संजय पाटील, माजी आमदार अजितराव घोरपडे, महादेव हिगमिरे यांनी मुंबईत भेट घेतली. त्यांनी सांगलीत शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या बेदाण्याची माहिती दिली. बेदाण्यावरील व्हॅटमुळे सौदे बाजार बंद होण्याचा धोका निर्माण झाला असल्याचे सांगितले. बेदाण्यावरील व्हॅटने शासनाच्या तिजोरीत फार मोठी भर पडणार नसल्याचे निदर्शनास आणून दिले. शरद पवार यांच्याशी सविस्तर चर्चा केल्यानंतर बेदाणा शेती उत्पन्न असल्याने त्यावरील व्हॅट शासनाने रद्द करावा, अशी सूचना पवार यांनी अर्थमंत्री सुनील तटकरे यांना केली आहे.
व्हॅट रद्दची प्रक्रिया सुरू होणार असल्याने शासनाने शेतकरी व कृषी उत्पन्न बाजार समित्यांना फार मोठा दिलासा दिला आहे. आमदार संजय पाटील, राज्य बँकेचे संचालक विलासराव जगताप, अजितराव घोरपडे यांच्या प्रयत्नाने बाजार समिती, व्यापारी यांच्या लढ्याला यश आले आहे. त्यामुळे सांगलीतील बेदाणा व्यापारपेठेच्या विकासाला फार मोठा हातभार लागणार असल्याचे जमदाडे यांनी सांगितले.
बेदाण्यावरील व्हॅट रद्द व्हावा यासाठी सांगली बाजार समिती, व्यापारी संघटना यांनी जोरदार लढा सुरू केला आहे. त्यासाठी सांगली, पंढरपूर, नाशिक व तासगाव या ठिकाणचा बेदाणा व्यापार बेमुदत बंद ठेवण्यात आला आहे. वसंतदादा मार्केट यार्डातील व्यापार एक दिवस बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे कोट्यवधी रुपयांच्या बेदाण्याची उलाढाल थांबली आहे. हे आंदोलन यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे.
दरम्यान, सभापती जमदाडे यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ आज मुंबईला रवाना झाले. व्हॅटसंदर्भात उद्या अर्थमंत्री सुनील तटकरे यांना ते भेटणार आहेत. जिल्ह्यातील सर्व मंत्री, बेदाणा उत्पादक पट्ट्यातील आमदार यांची अर्थमंत्र्यांसोबत बैठकही होणार आहे. बेदाण्यावरील व्हॅट रद्द झाला पाहिजे, अशी मागणी या बैठकीत करण्यात येणार आहे.
Source :-

बेदाण्यावरील व्हॅट रद्द ?/आज अधिकृत घोषणा शक्य
४ एप्रिल २०१०
सांगली, ४ एप्रिल: सुका मेव्याच्या यादीत बेदाण्याचा समाविष्ट केल्याने पाच टक्के मूल्यवर्धित कर लागला होता. याबाबत सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीने केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याकडे दाद मागितल्यानंतर त्यांनी राज्याचे अर्थमंत्री सुनील तटकरे यांच्याशी चर्चा करून बेदाण्यावरील मूल्यवर्धित कर रद्द करण्याची भूमिका राज्य शासनाने घेतली आहे, अशी माहिती बाजार समितीचे सभापती प्रकाश जमदाडे यांनी दिली. याबाबतची अधिकृत घोषणा अर्थ विभाग सोमवारी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
बेदाण्यावर मूल्यवर्धित कर लागू केल्यानंतर सांगली जिल्ह्य़ात वर्षांला होणारी एक हजार कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली होती. नव्या करप्रणालीला बाजार समित्या, बेदाणा व्यापारी, द्राक्ष बागायतदार व व्यापारी संघटना आदींनी जोरदार विरोध केला होता. मूल्यवर्धित कराच्या निषेधार्थ दि. १ एप्रिलपासून सांगली, तासगाव, पंढरपूर व नाशिक येथील सौदे बंद ठेवण्यात आले होते. राज्यात दररोज बेदाणा सौद्यात आठ ते दहा कोटी रुपयांची उलाढाल होत असते. देशातील अन्य कोणत्याही राज्यात बेदाण्याला मूल्यवर्धित कर लागू केलेला नाही. त्यामुळे हा व्यापार कर्नाटकात जाण्याची भीतीही व्यापारीवर्गातून व्यक्त होत होती.
राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळावी व शेतीमालाला मूल्यवर्धित करातून सवलत मिळावी, यासाठी शरद पवार यांच्याशी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीने संपर्क साधला होता. आमदार संजय पाटील यांनी याबाबतची सविस्तर माहिती त्यांना दिल्यानंतर त्यांनी तातडीने सुनील तटकरे यांच्याशी संपर्क साधून सांगली, सोलापूर व नाशिक या जिल्ह्य़ांच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या द्राक्ष व बेदाण्याबाबतची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे सांगितले. या तीनही जिल्ह्य़ांतून सुमारे तीन ते चार लाख टन बेदाण्याचे उत्पन्न होते व त्यातून किमान तीन ते चार हजार कोटी रुपयांची उलाढाल होत असते.
ही परिस्थिती पाहता राज्यातील बेदाणा सौदे बंद पडतील व या बाजारावर कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे नियंत्रण राहणार नाही. याचा सर्वाधिक फटका व्यापारीवर्ग व शेतकऱ्यांना बसू शकतो. शेतकऱ्यांकडून बेदाणा थेट खरेदी करून व्यापारी तो परराज्यात पाठवतील. त्यामुळे या व्यवहारात द्राक्षाप्रमाणेच फसवणुकीचे प्रकार होऊ लागतील, याचा विचार करून सुनील तटकरे यांनी शरद पवार यांच्या सूचनेप्रमाणे मूल्यवर्धित कर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहितीही प्रकाश जमदाडे यांनी दिली.
बेदाण्यावरील मूल्यवर्धित कर रद्द झाल्यामुळे या व्यापारावर अवलंबून असणारे शेतकऱ्यांसह सर्वच घटक सुखी होतील, असे सांगून प्रकाश जमदाडे म्हणाले की, सोमवारी मंत्रालयात होणाऱ्या बैठकीला सांगली, सोलापूर व नाशिक जिल्ह्य़ांतील सर्व आमदारांना निमंत्रित केले आहे. या पत्रकार बैठकीस शरद शहा यांच्यासह बाजार समितीचे सर्व संचालक, व्यापारी व शेतकरी उपस्थित होते.
Source :- Loksatta
एक कोटी २२ लाख रुपयांच्या नियंत्रित शिधाजिन्नसाचा अपहार
३ एप्रिल २०१०
घाटकोपर भागातील शिधावाटप कार्यालय क्रमांक ३४-ई अंतर्गत ११ शिधावाटप दुकानांना १६३८ इतक्या बोगस शिधापत्रिका संलग्न करून रॉकेल व धान्यादी वस्तूंचा सुमारे एक कोटी २२ लाख रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी मंत्रालयातून आदेश जाऊनही शिधावाटप नियंत्रकांनी चौकशी समिती नेमण्यासाठी तब्बल आठ महिने विलंब केल्याचे निष्पन्न झाले आहे. इतकेच नव्हे तर या प्रकरणी संबंधित शिधावाटप अधिकाऱ्यावर कोणतीही कठोर कारवाई झालेली नाही किंवा कोणाला बळीचा बकराही बनविण्यात आलेले नाही ही देखील आश्चर्याची बाब मानली जात आहे.
जुलै २००८ पासून ३४-ई शिधावाटप कार्यालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या एकंदर ११ शिधावाटप दुकानदारांनी बोगस शिधापत्रिकांच्या माध्यमातून हा सारा मलिदा मिळविला आहे. या शिधापत्रिका या पूर्णपणे काल्पनिक क्रमांक देऊन त्याची शिधावाटप कार्यालयात तशी नोंद करण्यात आली आहे. शिधावाटप कार्यालयात नोंद झाल्यानंतरच त्यांना अधिकृतपणा देण्याचे धाडस संबंधित कर्मचारी व अधिकारी यांनी केले ही सारी कारवाई कोणा एका अधिकाऱ्याची नसते ही बाब विद्यमान कार्यपद्धतीने स्पष्टच आहे. माजी अन्न व नागरी पुरवठामंत्री सुनील तटकरे यांच्या कार्यकाळात या शिधापत्रिका जारी करण्यात आल्या होत्या. त्या कोणाच्या आशीर्वादाने जारी केल्या गेल्या, तसेच वर्षभरानंतरही अद्याप संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कोणती कारवाई झाली, असा सवाल शिधावाटप वर्तुळात केला जात आहे.
घाटकोपरच्या या परिसरात बोगस शिधापत्रिका जारी केल्या गेल्या त्याबाबत मंत्रालय व शासन पातळीवर माहिती मिळाल्यानंतर १४ जानेवारी २००९ रोजी एक आदेश शिधावाटप नियंत्रकांना देण्यात आला होता. सदर प्रकरणी तपास करून बोगस शिधापत्रिका रद्द करण्याचे आदेशही देण्यात आले होते. परंतु सदर आदेशाची त्वरेने अमलबजावणी करण्यासाठी शिधावाटप नियंत्रकांनी टाळाटाळ केली असल्याचे दिसून येते. या आदेशान्वये चौकशी करण्यासाठी त्यांनी १९ सप्टेंबर २००९ च्या कार्यालयीन आदेशान्वये चौकशीसाठी ३४ ई या शिधावाटप कार्यालयांतर्गत तेथील प्रभारी शिधावाटप अधिकारी लक्ष्मी नारायण कोरगावकर व सहाय्यक शिधावाटप अधिकारी धनराज जाधव यांची नियुक्ती केली. त्यांच्या नेतृत्त्वाखाली २६ शिधावाटप निरिक्षकांच्या पथकाने याबाबत चौकशी केली.
दुकानांना दिलेल्या या बोगस शिधापत्रिका कशा नेमकेपणाने वाटल्या आहेत, त्यावरून या प्रकरणातील गांभीर्य व सूत्रबद्धपणाही सहज लक्षात येण्यासारखा आहे. चौकशी अहवालानुसार खालील दुकाने क्रमांकासह देत आहोत. कंसात बोगस शिधापत्रिकांची संख्या व अपहाराची रक्कम देत आहोत.
१) ३४-ई १०१ : (शिधापत्रिका १० - अपहार -६६१३५ रुपये)
२) ३४ -ई १११ : (शिधापत्रिका २०७ - अपहार -१७८३०७० रुपये)
३) ३४ -ई १५५ : (शिधापत्रिका ५२ - अपहार -४३०३०० रुपये)
४) ३४ -ई १६९ : (शिधापत्रिका १०९ - अपहार -९४४१३५ रुपये)
५) ३४ ई १८८ : (शिधापत्रिका ७३ - अपहार -६४०१७५ रुपये)
६) ३४ ई १९९ : (शिधापत्रिका ८४ - अपहार -६९७१७० रुपये)
७) ३४ ई २०४ : (शिधापत्रिका १६६ - अपहार -९९६०२५ रुपये)
८) ३४ ई २१८ : (शिधापत्रिका १५०- अपहार -४८५६७५रुपये)
९) ३४ ई ९३ : (शिधापत्रिका २१५ - अपहार -२६९५०५६ रुपये)
१०) ३४ ई - ९६ : (शिधापत्रिका ३६८ - अपहार -१७९७११५ रुपये) येथील शिधावाटप दुकानदाराने राजीनामा दिल्याने नंतर येथील शिधापत्रिका ३४ -ई९३ ला जोडल्या गेल्या.
११) ३४ ई- १४४ : (शिधापत्रिका २०४ - अपहार - १७३४९८६ रुपये)
Source :- Loksatta
रेशनकार्डधारकांसाठी शुल्ककाष्ठ कायम!
३ एप्रिल २०१०
रेशनकार्डांची वैधता तपासण्यासाठी तासनतास रांगा लावून सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली असतानाच राज्यकर्त्यांच्या डोक्यात आलेल्या नव्या कल्पनेमुळे पुन्हा रांगा लावण्याचे दिव्य रेशनकार्डधारकांच्या नशिबी येणार आहे. संगणकीय रेशनकार्डे देण्याचे काम गेली अनेक वर्षे प्रलंबित असताना आता बायोमेट्रिक रेशनकार्डे देण्याचे घाटत आहे. यासाठी रेशनकार्डांवर नावे असलेल्या सर्वांच्या बोटांचे ठसे घेतले जाणार आहेत.
राज्यातील सर्व रेशनकार्डांची वैधता तपासण्यासाठी अन्न व नागरीपुरवठा विभागाने गेल्या वर्षांच्या अखेरीस विशेष मोहिम राबविली होती. सर्व रेशनकार्डधारकांना त्यासाठी अर्ज भरून द्यावा लागला होता. हा अर्ज सादर करण्यासाठी सर्वसामान्य जनता मात्र पार हैराण झाली होती. कारण शिधावाटप विभागाच्या कार्यालयांमध्ये तासन्तास रांगेत उभे राहण्याचे दिव्य त्यांना पार करावे लागले होते. काही रेशनधारकांना तर त्यासाठी दोन दिवस सुट्टी घ्यावी लागली होती. आधीच शिधावाटप विभागात कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. अर्ज स्वीकृत करण्यासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग नाही वा एवढय़ा मोठय़ा संख्येने येणाऱ्या रेशनधारकांना रांगेत उभे राहण्यासाठी जागा नाही, अशी अवस्था झाली होती. मुंबई व ठाणे जिल्ह्यात तर परिस्थिती फारच गंभीर होती. शेवटी अर्ज स्वीकारण्याची मुदत सरकारला वाढवून द्यावी लागली होती. राज्यात सुमारे अडीच कोटी रेशनकार्डधारक आहे. या मोहिमेत सुमारे २० लाख रेशनकार्डधारकांनी अर्जच दाखल केलेले नसल्याने ही कार्डे आपोआपच रद्द झाली आहेत.
उर्वरित कार्डांची वैधता तपासण्याचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण होण्यास जुलै अथवा ऑगस्ट महिना उजाडेल, अशी शक्यता आहे. मागील सरकारमध्ये सुनील तटकरे हे अन्न व नागरीपुरवठामंत्री असताना रेशनकार्डांचे संगणकीकरण करण्याचे जाहीर करण्यात आले. निविदाही निघाल्या. मात्र यात गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराचे आरोप झाले. गेल्या पाच वर्षांमध्ये राज्यातील एकही रेशनकार्ड संगणकीय होऊ शकले नाही. तटकरे जाऊन अनिल देशमुख अन्न व नागरीपुरवठा विभागाचे मंत्री झाले. त्यांच्या डोक्यात नवी कल्पना आली. नुसती संगणकीय नाही तर बायोमेट्रिक कार्डे देण्याची योजना त्यांनी तयार केली. यामुळे बायोमेट्रिक कार्डे तयार करण्यासाठी अन्न व नागरीपुरवठा विभागाचे अधिकारी आता कामाला लागले आहेत. त्यासाठी केंद्र सरकारच्या विविध तीन यंत्रणांकडे आधी विचारणा करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारच्या यंत्रणांनी नकार दिला तर मग खासगी कंपन्यांची मदत घेतली जाईल. शासनातील अनुभव लक्षात घेता खासगी कंपन्यांनाच हे काम दिले जाईल अशीच शक्यता जास्त आहे. कारण महाराष्ट्र सरकारमध्ये व विशेषत: राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बी.ओ.टी.वर (खासगीकरण) जास्त भर आहे. बायोमेट्रिक रेशनकार्डांसाठी कार्डामध्ये नावे असलेल्या सर्वांचे बोटांचे ठसे घेतले जातील. हे ठसे घेण्यासाठी विशेष मोहिम राबविली जाणार आहे. शक्यतो मतदान केंद्रे असलेल्या ठिकाणीच ही मोहिम राबविण्याची अनिल देशमुख यांची योजना आहे. त्यासाठी शहरी भागात जाहिराती केल्या जातील तर ग्रामीण भागात दवंडी पिटली जाणार आहे. याचाच अर्थ रेशनकार्डधारकांना पुन्हा रांगा लावाव्या लागणार आहेत.
Source :- Loksatta
रत्नागिरीला ‘ब’ पर्यटन स्थळाचा दर्जा
२ एप्रिल २०१०
अर्थमंत्री सुनील तटकरे यांनी सादर केलेल्या सन २०१०-११च्या अर्थसंकल्पात कोकणाच्या पदरात भरभरून माप टाकल्याने, आता या मागास व गेली अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या प्रदेशाचा सर्वांगीण विकास जलदगतीने होणार आहे, असा विश्वास रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी काल केला आहे.
रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात कोकणसारख्या दुर्लक्षित भागाला प्राधान्य दिल्याने कोकण विकासाचे स्वप्न येत्या काही वर्षांंत निश्चित साकार होणार असल्याचे सांगितले. तालुक्यात ‘ब’ वर्ग पर्यटन स्थळ म्हणून मान्यता देण्याची तटकरे यांची घोषणा स्तुत्य असून, पर्यटन विकासामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होऊन त्याचा फायदा येथील लहान-मोठे हॉटेल व्यावसायिक, सुक्षिशित बेरोजगार तरुणांना होणार आहे. देशी व परदेशी पर्यटकांच्या येण्यामुळे बाजारपेठेतील उलाढाल वाढणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तालुक्यातील श्रीक्षेत्र पावसचा पर्यटनाच्यादृष्टीने आराखडा तयार करण्यात येत असून, पूर्णगड- जयगड हे किल्ले पर्यटकांना आकर्षक ठरावेत, यादृष्टीने त्यांची डागडुजी करण्यात येणार आहे.
रत्नागिरी येथील ‘काजू रत्न’ समूहाचे ८० लाख रुपयांचे कर्ज माफ करण्यात येणार असून, त्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यासाठी कृषी खात्याला सांगण्यात आले आहे. हा प्रस्ताव त्यांच्याकडून शासनाला लवकरच सादर केला जाणार आहे. याव्यतिरिक्त पाली काजू प्रक्रिया प्रकल्प आणि महिला पतपेढीचे कर्जमाफीचे प्रस्तावही पाठविण्याबाबत संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे, तर रत्नागिरी विधानसभा मतदार संघातील नाबर्डा- संगमेश्वर पाणीपुरवठा योजनेसाठी राज्य शासनाने ८० लाखांचा निधी मंजूर केला असून, पंतप्रधान ग्रामसडक योजनेसाठीही मोठय़ा प्रमाणात निधी मिळण्याची अपेक्षा असून, त्यातून खाडीला पर्याय ठरणाऱ्या रस्त्याचे काम या आर्थिक वर्षांपासून सुरू केले जाणार असल्याचे आमदार सामंत यांनी सांगितले.
मानेंचा प्रवेश १० किंवा ११ एप्रिलला गेले दोन महिने गाजत असलेला माजी राज्यमंत्री व सेनेचे ज्येष्ठ नेते रवींद्र माने यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश येत्या १० किंवा ११ एप्रिलला होणार असून, त्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार हे रत्नागिरीत येणार असून, त्यांच्या उपस्थितीतच माने यांचा प्रवेश सोहळा होणार आहे, असे याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात आ. सामंत यांनी सांगितले.
Source :- Loksatta
२८ मार्च २०१०
रायगड , रत्नागिरी व सिंधुदुर्ग या कोकण विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अनिल तटकरे यांचा विजय झाला. सुनिल तटकरे यांना ३४७ मते पडली असून राष्ट्रवादीचे बंडखोर माणिकराव जगताप १३२ मते तर शिवसेनेच्या उमेदवार उमेश शेट्ये यांना केवळ ९४ मते पडली.
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आज झालेल्या मतमोजणीत अर्थमंत्री सुनिल तटकरे यांचे बंधू असलेल्या अनिल तटकरेंनी जगताप यांचा २१५ यांचा पराभव केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मला अधिकृत उमेदवारी दिल्यामुळे माझ्या विजयचा पाया रोवला गेला होता, अशी प्रतिक्रिया अनिल तटकरे यांनी विजयानंतर व्यक्त केली. तर हा विजय सुनिल तटकरे किंवा अनिल तटकरेंना नसून पैशाच्या शक्तीचा आहे, अशी प्रतिक्रिया बंडखोर माणिकराव जगताप यांनी व्यक्त केली.
Source :- मटा ऑनलाइन वृत्त । रत्नागिरी
धक्कादायक निकाल?
२८ मार्च २०१०
कोकणातील पर्यटन, शिक्षण, पायाभूत सुविधांसाठी अनेक योजनांसाठी बजेटमध्ये तरतूद करण्यात अर्थमंत्री सुनील तटकरे यांच्या प्रयत्नांना यश आले असले तरी कोकण स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या उद्या रविवारी जाहीर होणा - या निकालाचा कौल अर्थमंत्र्यांच्या बाजूने लागणार की नाही याविषयी कोकणातील तीन जिल्ह्यांत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीचे बंडखोर माणिकराव जगताप यांच्या उमेदवारीमुळे चुरस असलेल्या या निवडणुकीत नारायण राणे आणि शेकापच्या रणनीतीमुळे हा निकाल धक्कादायक लागू शकतो, अशी राष्ट्रवादीत चर्चा आहे.
राष्ट्रवादीतफेर् सुनील तटकरे यांचे बंधू अनिल तटकरे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर माजी आमदार माणिकराव जगताप यांनी बंडाचे निशाण फडकावून सत्ताधारी आघाडीला चांगले आव्हान दिले. शेकाप नेते जयंत पाटील आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या पवित्र्यावरच तटकरे यांचे भवितव्य अवलंबून आहे. तथापि, संबंधित मतदारांना 'लक्ष्मीदर्शन' व 'पर्यटन सफर' घडविण्यात उमेदवारांनी कसूर ठेवली नाही. त्यामुळे निकालाची उत्कंठा वाढली आहे.
शेकापचा रायगड हा बालेकिल्ला भुसभुशीत करण्यात तटकरे यांची भूमिका मोठी आहे. कोकणातील काँग्रेसचा दबदबा वाढविण्याच्या राणे यांच्या प्रयत्नांना श्ाीवर्धनमध्ये रोखण्याचे काम तटकरे यांनी अप्रत्यक्षपणे केले होते. माजी मंत्री रवी पाटील यांना अस्मान दाखवण्याची किमया केल्याने तटकरे यांच्याविरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादीतील गट आणि शेकापची नेतेमंडळी एकत्र आल्याचे बोलले जाते.
तथापि, राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी राणे यांनी शरद पवार यांना शब्द दिल्याचे आणि जलसंपदा मंत्री अजित पवार यांच्या शब्दाखातर तटकरे यांच्याबाजूने शेकापच्या मतदारांनी मतदान केल्याचे जयंत पाटील समर्थक सांगत आहेत. तरीही राणे व शेकापच्या रणनीतीवर हा निकाल धक्कादायक लागू शकतो, अशी राष्ट्रवादीत चर्चा आहे. निवडणुकीसाठी ९९.४८ टक्के मतदान झाल्याने शिवसेना-भाजप-शेकाप महायुतीचे उमेश शेट्ये, राष्ट्रवादीचे अनिल तटकरे आणि बंडखोर माणिकराव जगताप यांच्यात कमालीची चुरस आहे. मात्र मुख्य लढत जगताप विरूद्ध तटकरे यांच्यातच आहे.
Source :- 
श्री. अनिल तटकरे विजयी
२८ मार्च २०१०

Source :- वार्ताहर
२८ मार्च २०१०

26th March 2010

26th March 2010

26th March 2010

26th March 2010

26th March 2010

26th March 2010

26th March 2010

26th March 2010

26th March 2010

26th March 2010

26th March 2010

26th March 2010

26th March 2010

26th March 2010

26th March 2010

26th March 2010

26th March 2010

26th March 2010

26th March 2010

26th March 2010

26th March 2010

26th March 2010

26th March 2010

26th March 2010

26th March 2010

दरवाढ नाही, करवाढ नाही
२५ मार्च
मुंबई, दि. २५ (प्रतिनिधी) : महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला दिलासा देता आला नाही तरी त्यांच्यावर करवाढीचा आणखी बोजा पडणार नाही, याची काळजी घेत ७ लाख ६५४ हजार, ५० कोटींची महसुली तूट दर्शविणारा अर्थसंकल्प अर्थमंत्री सुनील तटकरे यांनी विधानसभेत तर राज्यमंत्री विजय वडेट्टीवार यांनी विधान परिषदेत सादर केला.
तीर्थक्षेत्र, पर्यटनस्थळ, वाचनालय, संग्रहालय आणि कोणाच्या ना कोणाच्या स्मृतिप्रीत्यर्थ वेगवेगळ्या योजनांच्या घोषणा अर्थमंत्र्यांनी केल्या आहेत. सन २०१०-११च्या अर्थसंकल्पात महसुली जमा ९७,०४३.९० कोटी रुपये व महसुली खर्च १,०४,६९८.४१ कोटी अंदाजित केला असून महसुली तूट ७,६५४.५० कोटी इतकी आहे. केंद्रीय करातील राज्याचा हिस्सा म्हणून महाराष्ट्रात २०१०-११ ते २०१४-१५ या कालावधीत ७५,४०६ कोटी व सहाय्यक अनुदानाच्या रूपाने १६,३०२ कोटी असे एकूण ९१,७०९ कोटी रुपये प्राप्त होणार आहेत.
मूल्यवर्धित करात मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्यात येत असल्याचे सांगून अप्रत्यक्ष कराचे उत्पन्न हे राज्याच्या महसुलाचे मुख्य स्रोत आहे. त्यामुळे भविष्यात वस्तू व सेवा कर लागू केला जाईल. त्या दृष्टीने विक्री कर विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण व कर संकलनासाठी संशोधन करण्याकरिता रायगड जिल्ह्यात (पान १ वरून) कर प्रबोधिनी स्थापन करण्याची घोषणा त्यांनी केली. मूल्यवर्धित कर कायद्यातील काही कलमांमध्ये सुधारणा करून त्या सभागृहासमोर ठेवल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. तांदूळ, गहू, डाळी, त्यांचे पीठ तसेच मिरची, हळद, गुळ, चिच, नारळ, धणे, मेथी, पापड, खजूर, सोलापुरी चादरी-टॉवेल्स अशा अत्यावश्यक वस्तूंना ३१ मार्च २०१० पर्यंत करमाफी आहे. या वस्तूंवर ४ टक्के कराची शिफारस शक्ती प्रदत्त समितीने केली आहे. मात्र, ही करमाफी ३१ मार्च २०११ पर्यंत अथवा जीएसटी (गुड्स अॅण्ड सव्र्हिस टॅक्स अॅक्ट) लागू होईपर्यंत जो कालावधी कमी असेल त्यासाठी चालू राहील. मनुका, बेदाणे आणि चहावर १२.५ टक्के दराची शिफारस शक्ती प्रदत्त समितीने केली असली तरी जीएसटी लागू होईपर्यंत किवा ३१ मार्च २०११ पर्यंत जो कालावधी कमी असेल तोपर्यंत ५ टक्के दराने कर आकारला जाईल.
रुग्णांना रक्त देण्याकरिता ब्लड ट्रान्सफ्युजनची आवश्यकता असते. काही प्रकारच्या असाध्य रोगांमध्ये वारंवार रक्त देण्याची गरज असते. अशा रुग्णांच्या उपचारावरील आर्थिक बोजा कमी व्हावा म्हणून उपकरणांवरील १२.५ टक्क्याचा कर आता ५ टक्के असेल. वायू प्रदुषित न करता पर्यावरणाची हानी रोखणाऱ्या व इंधनाची बचत करणाऱ्या बॅटरी अथवा सौर ऊर्जेवर चालणाऱ्या वाहनांचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या किमती कमी करण्यासाठी अशा वाहनांवरील कर १२.५ टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात आला आहे. धूप, कापूर, लोभान, कात या सर्वसामान्यांच्या वापरातील वस्तू करमुक्त करण्यात आल्या आहेत. तर महिलांना कायम लागणाऱ्या हेअर पीनवरील कर ४ टक्क्यांवरून १ टक्का करण्यात आला आहे. साबुदाना चिवडा, चणा चूर आणि खांडवी यांच्यावरील कर कमी करण्यासाठी त्यांचा फरसाणसदृश्य पदार्थांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. ऐषाराम कर कायद्याच्या तरतुदीनुसार सध्या ज्या हॉटेलमध्ये प्रती निवास प्रती दिन ३०० रुपयांपर्यंत भाडे आहे, त्यांना ४ टक्के व १२०० रुपयांवरील भाडे असणाऱ्या निवासास १० टक्के कर लावला जातो. लहान हॉटेल व लॉज यांच्यासाठी ही मर्यादा वाढविण्यात आली आहे. आता ७५० रु. प्रती निवास भाडे करमुक्त करण्यात आले आहे तर ७५०च्या वर भाडे असणाऱ्या हॉटेल्सना लागणाऱ्या करात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आता बांधकाम व्यावसायिक व विकासक यांच्याकरिता सोपी, आपसमेळ योजना जाहीर करण्यात आली आहे. त्याअंतर्गत करारपत्रातील घरांच्या विक्रीच्या किमतीवर १ टक्का दराने करआकारणी करण्यात येईल. मात्र, बांधकाम व्यावसायिकांना व विकासकांना मूल्यवर्धित कराची वजावट अनुज्ञेय असणार नाही. ही आपसमेळ योजना १ एप्रिल २०१० पासून पुढे नोंदणी होणाऱ्या करारपत्रांच्या बाबतीत लागू राहील.
व्यापाऱ्यांना जलदगतीने परतावा देण्यासाठी विक्री बिलात खरेदीदार व्यापाऱ्यांचा टीन क्र. टाकणे यापुढे बंधनकारक असेल. त्यामुळे व्यापाऱ्यांनी मागितलेल्या वजावटीची खातरजमा संगणकावर होऊन व्यापाऱ्यांना लगेच परतावा मिळेल.
खरेदी केलेल्या प्रत्येक वस्तूचे बील ग्राहकाला मिळाले पाहिजे. काही विक्रेते विक्रीची बिले देत नाहीत. पर्यायाने विक्रीवरील कर चुकवला जातो. अशा बील न देणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध यापुढे अधिक कडक कारवाई केली जाणार आहे.
व्यवसाय कर आणि ऐषोराम कर कायद्यातील विवरण पत्रेसुद्धा इलेक्ट्राॅनिक स्वरूपात दाखल करण्याची सुविधा येत्या आर्थिक वर्षात व्यापाऱ्यांना देण्यात येईल. तब्बल दोन तास अर्थमंत्र्यांनी त्यांचे भाषण सादर केले. त्यात रायगड आणि नांदेड या दोन जिल्ह्यांसाठीच्या होत असलेल्या वेगवेगळ्या घोषणांना पाहून विरोधकांनी अनेक वेळा भाषणात अडथळेही आणले.
नो कर ..नो डर !
मुंबई, २५ मार्च / खास प्रतिनिधी
अर्थसंकल्पापूर्वीच व्हॅटच्या दरांमध्ये वाढ करण्यात आल्यामुळे आज सादर करण्यात आलेल्या राज्याच्या २०१० -११ च्या अर्थसंकल्पात कोणत्याही प्रकारची करवाढ करण्यात आलेली नाही. कापूर, महिलांच्या हेअरपिन, रक्त बदलण्यासाठी लागणारी उपकरणे, काही कृषी साहित्य इ. वस्तूंवरील करात कपात करण्यात आली आहे. राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांनिमित्त तीर्थस्थळे आणि पर्यटनस्थळांसाठी मात्र भरीव तरतूद करण्यात आली आहे. अर्थसंकल्प प्रथमच सादर करीत असलेल्या वित्तमंत्री सुनील तटकरे यांनी कोकण आणि विशेषत: आपल्या रायगड जिल्ह्याला तसेच मुख्यमंत्र्यांच्या नांदेड जिल्ह्याला झुकते माप दिले आहे. नांदेड आणि रायगडमध्ये २७ विविध योजनांची खैरात करीत या जिल्ह्यांचे चांगभले करण्याच्या वित्तमंत्र्यांच्या या पुढाकारामुळे हा राज्याचा की, रायगड, नांदेड जिल्ह्यांचा अर्थसंकल्प, अशी संभावना सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरून करण्यात येत होती. नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत कर्जावरील व्याज माफ करून दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
राज्याचा अर्थसंकल्प सादर करणारे तटकरे हे कोकणातील पहिलेच वित्तमंत्री ठरले आहेत. कोकणाला झुकते माप देत त्यांनी कोकणवासीयांच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. महसुली उत्पन्नात तूट आल्याने अधिक कर्ज घ्यावे लागेल, असा इशारा आर्थिक पाहणी अहवालात देण्यात आला आहे. उत्पन्न वाढीसाठी करवाढ करण्यात येईल अशी अटकळ बांधण्यात येत होती. या महिन्याच्या सुरुवातीलाच वित्त विभागाने जवळपास १०० वस्तूंवरील व्हॅटच्या दरात एक टक्का वाढ केली आहे. परिणामी राज्याच्या उत्पन्नात ७०० कोटींच्या आसपास वाढ होण्याची शक्यता आहे. व्हॅटच्या दरामध्ये आधीच दरवाढ करण्यात आल्याने अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ केली नाही, अशी पाठ सत्ताधारी थोपटून घेतल्याशिवाय राहणार नाहीत. निवडणुकीनंतरच्या पहिल्याच अर्थसंकल्पाबाबत जनतेच्या मोठय़ा अपेक्षा होत्या. मात्र हा अर्थसंकल्प दिशाहीन असल्याची टीका होत आहे. तटकरे यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प हा सात हजार, ६५४ कोटी ५० लाख रुपये तुटीचा आहे. महसुली जमा ९७,०४३ कोटी तर खर्च १ लाख ०४ हजार कोटी रुपये अंदाजित आहे. सुवर्ण महोत्सवी वर्षांनिमित्त केंद्रीय नियोजन आयोगाने खास बाब म्हणून गेल्या वर्षी ३७ हजार कोटींची वार्षिक योजना मंजूर केली होती. महसुली तूट वाढल्याने यंदा आकारमान कमी करण्यात आले असून, यंदा ३३ हजार ९३५ कोटी रुपयांची योजना केंद्राकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आल्याचे तटकरे यांनी सांगितले. तटकरे यांच्या रायगड जिल्ह्यातील विविध १७ योजनांसाठी तर मुख्यमंत्र्यांच्या नांदेड जिल्ह्यातील १० योजनांसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. मुंबईतील पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ब्रिमस्टोव्ॉड प्रकल्पासाठी केंद्र सरकारने १२०० कोटी रुपये मंजूर केले असून आतापर्यंत ९०० कोटी रुपये प्रत्यक्ष दिले आहेत.
अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्टय़े* कापूर, धूप, लोबान, कात करमुक्त.
* सौर कंदील करमुक्त.
* महिलांच्या हेअरपिनवरील कर चारवरून एक टक्का.
* सौर ऊर्जेवर चालणाऱ्या वाहनांवरील कर साडेबारा टक्क्यांवरून पाच टक्के.
* गांडूळ खतासाठी वापरल्या जाणाऱ्या व्हर्मीकंपोस्ट बेड करमाफ.
* ऑटोरिक्षा आणि टॅक्सीसाठी दरवर्षी कर वसुलीऐवजी एकरकमी कर.
* ७५० रुपयांपर्यंत खोलीचे भाडे असलेल्या हॉटेल्समधील ऐषाराम करमाफ.
* घरांच्या विक्रीतील करामध्ये सुटसुटीतपणा आणण्याचा प्रयत्न.
* केंद्राने शिफारस करूनही तांदूळ, गहू, डाळी, नारळ इ. वरील करमाफी ३१ मार्च २०११ पर्यंत लागू.
* चहावर साडेबारा टक्के कर आकारणीची शिफारस असताना चारवरून एक टक्का वाढ करून पाच टक्के कर .
* व्हॅटसाठी ४० लाखाऐवजी ६० लाखांची उलाढाल बंधनकारक केल्याने व्यापाऱ्यांना दिलासा.
* साबुदाणा चिवडा, चणाचूर यांचा फरसाणमध्ये समावेश केल्याने करमुक्त.
* खादी ग्रामोद्योग विभागाने मान्यता दिलेले कपडे धुण्याचे साबण करमुक्त.
* तुळजापूर, देहू, आळंदी, शेगाव, पैठण, श्री क्षेत्र परशुराम, भराडी देवी, कुणकेश्वर, जेजुरी या देवस्थानांसाठी ३०० कोटींची तरतूद.
* मुंबईच्या जे. जे. रुग्णालयासाठी केंद्राचे १०० कोटी तर राज्याचे २० कोटी अशी एकूण १२ ० कोटींची तरतूद.
* रायगड आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
* सिंचनासाठी ७,३६६ कोटींची तरतूद.
* अल्पसंख्यांकाच्या विकासासाठी २२१ कोटी रुपये.
* सचिन तेंडुलकर यांच्या नावाने क्रीडा संग्रहालय मुंबईत उभारणार.
* मुंबई-पुणे-नाशिक-औरंगाबाद हा ज्ञान महामार्गाचा सुवर्ण चतुष्कोन.
* भारतीय चित्रपटसृष्टीचा गौरवशाली इतिहास चित्रित करणारे संग्रहालय मुंबईत उभारणार.
* आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्याकरिता प्रोत्साहन अनुदान १५ हजार रुपयांवरून ५० हजार रुपयांपर्यंत वाढ.
* मुंबईतील पावसाळी पाण्याच्या निचऱ्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ब्रिमस्टोव्ॉड प्रकल्पाला २०० कोटी.
* थोर नाटककार विजय तेंडूलकर यांच्या नावाने पाच युवा नाटय़लेखकांना ५० हजार रुपयांची शिष्यवृत्ती
Source :- मटा ऑनलाइन वृत्त । रत्नागिरी
Links to Visit
