राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (NCP)
४ एप्रिल २०१०
शिक्षणसेवकांचे मानधन वाढवण्याचे ग्रामविकास मंत्र्यांचे आश्वासननाशिक, दि. ३ (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या रोहा येथे झालेल्या राज्यस्तरीय अधिवेशनात शिक्षणसेवक, वस्तीशाळा शिक्षकांच्या मानधनात वाढ करण्याबरोबरच अन्य मागण्या सोडविण्याचे आश्वासन ग्रामविकास मंत्री जयंत पाटील व वित्तमंत्री सुनील तटकरे यांनी दिल्याची माहिती समितीने पत्रकान्वये दिली आहे.
Read More »
बेदाण्याचा व्हॅट रद्द होणार : शरद पवारांची अर्थमंत्र्यांना सूचना सभापती प्रकाश जमदाडे यांची माहितीसांगली, दि. ४ (प्रतिनिधी) : बेदाण्यावर लावण्यात आलेला पाच टक्के व्हॅट रद्द करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला यश मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी अर्थमंत्री सुनील तटकरे यांना तशी सूचना दिली असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश जमदाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, जमदाडे आज नेत्यांना भेटण्यासाठी शिष्टमंडळासह मुंबईला रवाना झाले.
३ एप्रिल २०१०
एक कोटी २२ लाख रुपयांच्या नियंत्रित शिधाजिन्नसाचा अपहारशिधावाटप नियंत्रकांकडून चौकशी समिती नेमण्यास तब्बल आठ महिने विलंबघाटकोपर भागातील शिधावाटप कार्यालय क्रमांक ३४-ई अंतर्गत ११ शिधावाटप दुकानांना १६३८ इतक्या बोगस शिधापत्रिका संलग्न करून रॉकेल व धान्यादी वस्तूंचा सुमारे एक कोटी २२ लाख रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी मंत्रालयातून आदेश जाऊनही शिधावाटप नियंत्रकांनी चौकशी समिती नेमण्यासाठी तब्बल आठ महिने विलंब केल्याचे निष्पन्न झाले आहे. इतकेच नव्हे तर या प्रकरणी संबंधित शिधावाटप अधिकाऱ्यावर कोणतीही कठोर कारवाई झालेली नाही किंवा कोणाला बळीचा बकराही बनविण्यात आलेले नाही ही देखील आश्चर्याची बाब मानली जात आहे.
रेशनकार्डधारकांसाठी शुल्ककाष्ठ कायम!रेशनकार्डांची वैधता तपासण्यासाठी तासनतास रांगा लावून सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली असतानाच राज्यकर्त्यांच्या डोक्यात आलेल्या नव्या कल्पनेमुळे पुन्हा रांगा लावण्याचे दिव्य रेशनकार्डधारकांच्या नशिबी येणार आहे. संगणकीय रेशनकार्डे देण्याचे काम गेली अनेक वर्षे प्रलंबित असताना आता बायोमेट्रिक रेशनकार्डे देण्याचे घाटत आहे. यासाठी रेशनकार्डांवर नावे असलेल्या सर्वांच्या बोटांचे ठसे घेतले जाणार आहेत.
२ एप्रिल २०१०
रत्नागिरीला ‘ब’ पर्यटन स्थळाचा दर्जाअर्थमंत्री सुनील तटकरे यांनी सादर केलेल्या सन २०१०-११च्या अर्थसंकल्पात कोकणाच्या पदरात भरभरून माप टाकल्याने, आता या मागास व गेली अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या प्रदेशाचा सर्वांगीण विकास जलदगतीने होणार आहे, असा विश्वास रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी काल केला आहे.
२८ मार्च २०१०
धक्कादायक निकाल?कोकणातील पर्यटन, शिक्षण, पायाभूत सुविधांसाठी अनेक योजनांसाठी बजेटमध्ये तरतूद करण्यात अर्थमंत्री सुनील तटकरे यांच्या प्रयत्नांना यश आले असले तरी कोकण स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या उद्या रविवारी जाहीर होणा - या निकालाचा कौल अर्थमंत्र्यांच्या बाजूने लागणार की नाही याविषयी कोकणातील तीन जिल्ह्यांत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
श्री. अनिल तटकरे विजयी